Mumbai-Latur-Bidar Express | पुणे रेल्वे स्थानकात लातूरकर प्रवाशांनी मुंबई बीदर एक्सप्रेस रोखली, मोठा खोळंबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लातूर प्रवाशांनी पुणे रेल्वे स्थानकात (Pune Railway Station) गोंधळ घातला. प्रवाशांनी मुंबई – बीदर एक्सप्रेस (Mumbai-Latur-Bidar Express) दोन तास रोखून ठेवली. त्यामुळे रेल्वेतील प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. ही एक्सप्रेस मुंबईहून शनिवारी रात्री बीदरसाठी रवाना झाली होती. गाडी मुंबईहून येतानाच गच्च भरून आली होती. त्यामुळे आतील प्रवाशांनी डब्यांचे दरवाजे बंद केले होते. त्यामुळे फलाटवरील प्रवाशांना गाडीत चढता आले नाही. प्रवाशांनी गोंधळ माजवला आणि गाडी फलाटावरच रोखून ठेवली. काही प्रवाशी रेल्वे रुळावर झोपून आंदोलन सुरू केले. रेल्वे पोलिसांनी मध्यस्थी करत प्रवाशांची समजूत घातली आणि रेल्वेतील प्रवाशांना दारे उघडण्यास सांगून परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न केला. (Mumbai-Latur-Bidar Express)

 

आंदोलकांची समजूत काढल्यावर प्रवाशांना घेऊन रेल्वे रवाना झाली. पण रेल्वे तिच्या नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिराने पोहचली. रविवारी लातूर जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान होत आहे. त्यामुळे पुणे, मुंबईहून अनेक लोक मतदानासाठी लातूरला निघाले आहेत. मुंबई-बीदर एक्स्प्रेस (Mumbai-Latur-Bidar Express) शनिवारी रात्री मुंबईवरून येतानाच प्रचंड गर्दीने भरून आली होती. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकात प्रवाशांनी डब्यांची दारे आतून लावली होती. त्यामुळे हा बाका प्रसंग इतरांवर ओढवला. फलाटवरील प्रवाशांनी आंदोलनाचा पवित्रा घेताच परिस्थिती चिघळली आणि पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा गोंधळ झाला.

माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ही गाडी सुरू केली होती.
लातूरकरांना जागा देत नाहीत, असा संताप व्यक्त करत महिला प्रवाशांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
यावेळी महिला आणि तरुणांचा मोठा आक्रोश पुणे रेल्वे स्थानकात झाला.
पोलिसांनी मध्यस्थी केली आणि सर्व प्रवाशांना रेल्वेत बसण्यासाठी जागा करुन दिली.
या सर्व गोंधळात दोन तास निघून गेले. परिणामी लातूरला सकाळी सहा वाजता पोचणारी गाडी आठ वाजता गेली.

 

 

 

 

Web Title :- Mumbai-Bidar Express | mumbai bidar express halt for two hours at pune railway station due to passengers protest

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा