आता काय इलेक्ट्रीक कार चालवताय का ?, काँग्रेस नेते भाई जगताप यांचा बॉलिवूड सेलिब्रेटींना उपरोधिक टोला

पोलीसनामा ऑनलाईन :  मुंबई काँग्रेसचे शहराध्यक्ष भाई जगताप यांनी बॉलिवूड कलाकारांचे जुने ट्विट्स शेअर करुन काँग्रेसच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर बोलणारे आज शांत का? असा सवाल केला आहे. अमिताभ यांनी 2012 मध्ये पेट्रोल 60 रुपयांवर गेले तेंव्हा रामायणाचा दाखला देत काँग्रेस सरकारवर टीका केली होती. आता पेट्रोल शंभरी गाठतय मग आता हे सेलिब्रिटी गप्प का? त्यांनी आता काय इलेक्ट्रीक कार चालवतात का ? असा उपरोधिक टोला भाई जगताप यांनी लगावला आहे.

 

 

 

 

 

काँग्रेसच्या काळात झालेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीवर त्यावेळी बॉलीवूडचे अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अनुपम खैर यांनी टीका केली होती. जगताप यांनी आता अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अनुपम खैर यांनी 2012 मध्ये केलेल्या एका ट्विटची आठवण करुन दिली आहे. केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार असताना पेट्रोल-डिझेल दरवाढ झाल्यावर अमिताभ बच्चन यांनी रामायणाचा दाखल देत गाड्या कॅशमध्ये करता येतील पण पेट्रोलसाठी कर्ज काढावे लागेल असे म्हटले होते. तर अक्षय कुमारने आता सायकल चालवण्याची वेळ आली असल्याचे म्हटले होते. तर अनुपम खैर यांनी एक विनोद ट्विट करत पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन काँग्रेस सरकारची खिल्ली उडवली होती. त्यामुळे भाई जगताप यांनी आता त्यांचा समाचार घेतला आहे.