Mumbai Crime | वंशाच्या दिव्यासाठी न्यायाधीशाच्या मुलीचा परदेशात नेऊन केला 8 वेळा गर्भपात, सासरच्या मंडळींवर FIR दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Crime | वंशाचा दिवा पाहिजे म्हणून एका उच्चशिक्षित, प्रतिष्ठीत पतीने परदेशात नेऊन पत्नीचा तब्बल आठ वेळा गर्भापात (abortions) केल्याचा धक्कादायक प्रमार दादरमध्ये (dadar) घडली. मुलीचे वडील निवृत्त न्यायाधिश असून त्यांनी थाटामाटात मुलीचा विवाह करून दिला. मात्र, या घटनेमुळे प्रतिष्ठेचा आड दडलेली विकृत मानसिकता समोर आल्याने त्यांना धक्का बसला आहे. याप्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार वकील कुटुंबाविरुद्ध गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्यासह हुंड्यासाठी छळ व अन्य कलमांतर्गत शुक्रवारी गुन्हा (Mumbai Crime) दाखल केला आहे.

४० वर्षीय तक्रारदार महिला या प्रभादेवी (prabhadevi) परिसरात राहणाऱ्या आई-वडिलांसोबत राहतात. त्यांचा २००७ मध्ये वकिली क्षेत्रातील प्रतिष्ठित मुलासोबत विवाह लावून दिला. सोबत ६२ तोळे सोन्याचे दागिनेही दिले. पती व सासू, सासरे वकील, तर ननंद डॉक्टर आहे. महिन्याला ७ ते ८ लाख उत्पन्न आहे.

लग्नाच्या काही दिवसानंतर वंशाचा दिवा पाहिजे म्हणून सासरच्या मंडळींकडून जाचहाट सुरु झाला. वेळप्रसंगी मारहाण देखील केली. मुलगा होण्यासाठी प्रसिद्ध डॉक्टरांकडे उपचारही सुरु केले. तसेच पतीने प्री इम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस (जन्मापूर्वी लिंग तपासणीसाठी बीजाची अंमलबजावणी) या टेस्टसाठी बँकॉकमध्ये नेले. तेथे ८ वेळा गर्भ धारणेच्या आधी एम्ब्रियोच्या लिंगाची (बीजाची) परीक्षा करून उपचार व शस्त्रक्रिया करीत होते. यासाठी जवळपास दीड हजारांपेक्षा जास्त हार्मोनल व स्टिरॉइड इंजेक्शन देण्यात आली होती. भारतामध्ये बंदी असलेल्या ट्रीटमेंटसाठी संमतीशिवाय परदेशात नेऊन जवळपास ८ वेळा ही ट्रीटमेंट करून गर्भपात केला.

२००९ मध्ये मुलीला जन्म दिल्यानंतर दिवसेंदिवस अत्याचार वाढू लागले २०११मध्ये पुन्हा गर्भवती
राहिल्याने मूल नको म्हणून पतीने जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले. तर २०१५ मध्ये
मारहाण करत ठार मारण्याचा प्रयत्न सासरच्या मंडळींकडून झाला. महत्त्वाचे म्हणजे ६८ तोळे सोने
व ७० लाख रोख रक्कम सासरच्या मंडळींकडे असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.

हे देखील वाचा

PM Kisan | शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये 2000 रुपयांऐवजी येतील 4000 रुपये! सरकार वाढवणार आहे योजनेची रक्कम?

Vinayak Raut | ‘नारायण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही’


ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Mumbai Crime | eight abortions judges daughter descent crime against laws husband incidents highbrow

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update