Mumbai News : नायर रुग्णालयात 26 वर्षीय डॉक्टरची इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या, प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नायर रुग्णालयातील एका 26 वर्षाच्या डॉक्टरने आत्महत्या केल्याची खळबळजन घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या डॉक्टर मध्यरात्रीच्या सुमारास स्वत:ला इंजेक्शन टोचून घेत आपली जीवनयात्र संपवली. त्याने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले यामागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

नायर रुग्णालयीतील 26 वर्षीय डॉक्टरने आपल्या खोलीत इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरचा मृतदेह त्याच्या खोलीत आढळून आला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. डॉक्टरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. डॉक्टराच्या आत्महत्ये मागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर मूळचा औरंगाबाद येथील होता. तो काही दिवस रजेवर होता. तो पुन्हा कामावर हजर झाला होता. काल मध्यरात्री खोलीत त्याचा मृतदेह आढळून आला. इंजेक्शन टोचून घेत त्याने आपले जीवन संपवले. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, पुढील तपास सुरु आहे. नायर रुग्णालयात यापूर्वी 2019 मध्ये डॉ. पायल तडवी हिने आत्महत्या केली होती.