Mumbai Crime News | मुंबई हादरली! गोणीत आढळला तरुणीचा हात-पाय तोडलेला मृतदेह; प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Crime News | मुंबईतील (Mumbai News) एका अज्ञात तरुणीचा मृतदेह ( Mumbai Crime News) आढळून आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईतील वरळी सी फेसवर (Worli Sea Face) एका अज्ञात तरुणीचा मृतदेह (Dead Body) आढळून आला. एका गोणीत हा मृतदेह होता. हात-पाय तुटलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह गोणीत होता. याप्रकरणी वरळी पोलिसांनी (Worli Police) अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, तरुणीची हत्या (Murder In Mumbai) करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. मृत तरुणीचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. वरळी पोलिसांनी अज्ञाताविरुध्द हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी श्रद्धा वालकर हत्याकांड (Shraddha Walker Murder Case), नंतर सरस्वती आणि आता आणखी एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या हत्या प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून झाल्याचे समोर आले होते. अशा घटनांमध्ये सध्या वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महिला आणि मुलींमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title : Mumbai Crime News | dead body of young woman found on worli sea face worli police registered case against unknown person

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्याचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव

Today Horoscope | 5 July Rashifal : मेष, कर्क आणि मीन राशीसाठी दिवस यश देणारा, वाचा १२ राशींचे दैनिक राशीभविष्य

Petrol-Diesel Price Today | पुणे, मुंबईसह प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर काय? जाणून घ्या

Amol Mitkari | “शरद पवार आव्हाडांची खासगी मालमत्ता नाही”; अमोल मिटकरींनी आव्हाडांना खडसावले

Monsoon Update | अनेक राज्यात 8 जुलैपर्यंत मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज