Mumbai Cruise Drug Case | किरण गोसावी पुन्हा ‘पसार’, पुणे पोलिसांच्या हातातून थोडक्यात निसटला?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  क्रूझ ड्रग्स पार्टी (Mumbai Cruise Drug Case) प्रकरणात वादग्रस्त असलेल्या किरण गोसावीने (Kiran Gosavi) पुणे पोलिसांना उत्तर प्रदेशामध्ये (Uttar Pradesh) गुंगारा दिला दिला असल्याची सध्या पोलिस वर्तुळामध्ये चर्चा आहे. एकिकडे आर्यन खान (Aryan Khan) अटक प्रकरणावर (Mumbai Cruise Drug Case) सुनावणी सुरु असताना या प्रकरणातील पंच पसार झाला आहे. मागील काही दिवसांपासून फरार असलेला किरण गोसावी उत्तर प्रदेशातील लखनऊ (Lucknow) इथं लपून बसला होता. त्याने स्वत: पोलीसंना शरण येणार असं जाहीर केलं होतं. मात्र पुणे पोलीस (Pune Police) लखनौला पोहचण्यापुर्वीच तो तिथूनही पळून गेला असं समजतंय मात्र त्यास अद्याप पोलिसांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.

 

किरण गोसावी पुण्यातील एका गुन्ह्यात फरार आहे. दरम्यान, मुंबई क्रूझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणामुळे (Mumbai Cruise Drug Case) तो चर्चेत आला.
त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. परंतु तो पोलिसांना गुंगारा देत होता. मोठ्या मुश्किलीने त्याचा ठावठिकाणा लागला होता.
किरण गोसावी हा उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये लपून बसल्याचे समोर आल्यानंतर सोमवारी रात्री तो पोलिसांना शरण येणार होता.
तो मंडियांव पोलीस आयुक्तालयात (Mandiyanv Police Commissionerate) हजर होणार होता.

 

मात्र सोमवारी रात्री उशीरापर्यंत तो शरण आला नाही. पुणे पोलिसांचं पथक पोहोचण्याआधीच गोसावी लखनऊमधून पळून गेल्याचं कळतंय.
गोसावी हा उत्तर प्रदेशात असून तो त्याचे लोकेशन सातत्याने बदलतोय. आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान त्याचं शेवटचं लोकेशन हे फत्तेपूर असल्याची पोलिसांची माहिती आहे.

 

Web Title : Mumbai Cruise Drug Case | aryan khan arrest case kiran gosavi escapes from lucknow pune police searching him

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Reliance Jio-BP ने सुरू केले पहिले मोबिलिटी स्टेशन, पेट्रोल-डिझेल आणि ईव्ही चार्जिंगसह मिळतील अनेक सुविधा

LIC Jeevan Umang | 1302 रुपये प्रीमियम देऊन मिळतील 27.60 लाख रुपये, जाणून घ्या या पॉलिसीबाबत सर्वकाही

NCB Officer Sameer Wankhede | आता ‘या’ तक्रारीमुळं समीर वानखेडेंच्या अडचणीत आणखी भर