PMC बँक घोटाळा : दुसरं लग्न करण्यासाठी निलंबीत MD ‘जॉय’ बनला ‘जुनेद’, पुण्यात घेतले 9 फ्लॅट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (PMC) बँकेचे निलंबित एमडी जॉय थॉमस यांच्याविषयी मोठा खुलासा झाला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी जॉय थॉमस यांच्याकडून केवळ बँक घोटाळ्याचे सत्य काढले नाही तर त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक मोठे रहस्यही समोर आली आहेत. थॉमसने आपल्या पीएशी लग्न करण्यासाठी धर्मांतर केल्याची कबुली दिली आहे. इतकेच नाही तर तिच्या नावावर जॉयचे पुण्यात 9 फ्लॅटही आहेत.

पीएमसी बँकेच्या 4,355 कोटींच्या घोटाळा प्रकरणी पोलिसांनी एमडी जॉय थॉमस आणि एचडीआयएलचे प्रमोटर राकेश वाधवन आणि त्यांचा मुलगा सारंग वाधवन यांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बँकेचे माजी अध्यक्ष वरयम सिंह यांनाही ताब्यात घेतले आहे. या घोटाळ्याशी संबंधित असलेल्या एका आरोपीने माहिती दिली की, थॉमस विवाहित होता आणि त्याचे कुटुंबही होते, असे असूनही त्याने पीएशी दुसरे लग्न केले. 2005 मध्ये पीएने आपली नोकरी सोडली आणि सांगितले की ती लग्न करण्यासाठी दुबईला जात आहे. लग्नानंतर ती दुबईमध्येच राहणार आहे. नंतर माहित झाले की ती मुंबईहून पुण्यात स्थायिक झाली. जॉय थॉमस याने धर्मांतर करून जुनेद नाव धारण केले. लग्नानंतर जॉय मुंबईहून सतत पुण्याला जात-येत होता.

थॉमसच्या या पीएच्या नावावर पुण्यात तब्बल नऊ फ्लॅट असल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. या फ्लॅट्सची एकूण किंमत 4 कोटी रुपयांच्या घरात आहे. थॉमसच्या पीएने पुण्यात इतक्या संपत्ती कशा विकत घेतल्या हे शोधण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. चौकशी दरम्यान थॉमस यांनी सांगितले की त्याने लग्नासाठी आपले नाव जुनेद ठेवले होते, परंतु या नावाने त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे अस्तित्त्वात नाहीत. या धर्मांतराचा आणि नाव बदलल्याचा जॉय थॉमसने गैरवापर केला असावा, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

मुंबई आणि ठाण्यातील जॉय थॉमसचे 4 फ्लॅट्स जप्त
पोलिसांनी जॉय थॉमस याच्या मालकीचे मुंबई आणि ठाण्यातले 4 फ्लॅट्स ताब्यात घेतले. यातला एक फ्लॅट त्याच्या पहिल्या पत्नीच्या मुलाच्या नावावर आहे. जॉय थॉमस आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीने एका मुलीला दत्तक घेतलं. ती आता 11 वर्षांची आहे. त्यांना 10 वर्षांचा एक मुलगाही आहे. जॉय थॉमस याची दुसरी पत्नी चॉकलेट्सची विक्री करते, तिचं बुटिकही आहे आणि पुण्यातल्या मालमत्तेचं भाडंही तिला मिळतं, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जॉयच्या दुसऱ्या पत्नीविषयी कळल्यानंतर जॉय थॉमसच्या पहिल्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like