धक्कादायक ! महिला आणि मुलांच्या मानवी तस्करीत देशातील ‘हे’ सर्वात श्रीमंत शहर ‘अग्रेसर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशभरातून लहान मुलं आणि महिलांच्या तस्करीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशा मानवी तस्करी प्रकरणांची संख्या देशातील मुंबई, कोलकाता आणि इंदोरसारख्या ठिकाणी जास्त आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोनं (NCRB) दिलेल्या आकडेवारीनुसार अशी माहिती समोर आली आहे. या आकडेवारीत मुंबई सर्वात पुढे आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर बेपत्ता असणाऱ्या महिला आणि मुलांची माहिती गोळा करण्यात आली. यासाठी २०११ ला सर्वोच्च न्यायालयानं एक समिती स्थापन केली होती. या समितीनं २०१९ ला आपला अहवाल सादर केला होता.

NRCB दिलेल्या माहितीनुसार समोर आले आहे की, हे मानवी तस्करी ही लैंगिक शोषण, बाल कामगार आणि जबरदस्तीनं विवाह करणे अशा काही कारणांमुळे केली जाते. २०१८ ला ‘युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राईम (UNODC) चा अहवाल जाहीर झाला, या अहवालाप्रमाणे, लैगिक शोषणासाठी महिलांची तस्करी करण्याचे प्रमाण हे अधिक होते. जबरदस्तीनं मजूरवर्गात तस्करी करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये ३५ टक्के प्रमाण महिलांचे होते. तर मजुरी करण्यासाठी पुरुषांचं प्रमाण अधिक होते. या अहवालानुसार मानवी तस्करीचं सर्वात जास्त प्रमाण मुंबई, पुणे आणि ठाणे येथे होते. मुंबईत २०१७ ला ४७१८ तर २०१८ ला ५२०१ महिला बेपत्ता होत्या. तर पुण्यात २०१७ ला २५७६ आणि २०१८ ला २५०४ महिला बेपत्ता होत्या.

लहान मुलं बेपत्ता होण्याच्या बाबतीत मध्य प्रदेश सर्वात पुढे असून महिला बेपत्ता असल्याच्या बाबतीत महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. २१०६-१८ दरम्यान मुलं आणि महिला बेपत्ता होण्याच्या तक्रारींमध्ये पश्चिम बंगाल दुसऱ्या स्थानी आहे. कोलकात्यात २०१८ ला २५८४ महिला या बेपत्ता होत्या तर ९८९ मुलं ही बेपत्ता होती. मध्य प्रदेशमधील इंदोरमध्ये २०१७ ला १७५५ आणि २०१८ ला २४५८ महिला बेपत्ता होत्या तर २०१७ ला ५९६ आणि २०१८ ला ८२३ मुलं बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.