Mumbai High Court | वैद्यकीय तपासणीत ‘ती’ चा झाला ‘तो’, पोलीस खात्यात नोकरी देण्याचे कोर्टाचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai High Court | मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला (Maharashtra State Government) राज्य राखीव पोलीस (State Reserve Police) खात्यात एका महिलेची नियुक्ती दोन महिन्यात निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित महिलेने पेास्ट संबंधित परीक्षा उत्तीर्ण केली होती. परंतु वैद्यकीय अहवालात (Medical Examination) ही महिला नसून पुरुष असल्याचे निष्पन्न झाले. राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी (State Advocate General Ashutosh Kumbakoni) यांनी न्यायालयाला सांगितले की, राज्य सरकारने या प्रकरणात सहानुभुतीपूर्ण दृष्टीकोन ठेवून महिलेची पोलीस खात्यात पोलीस हवालदार सोडून इतर कोणत्याही पदावर नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे (Mumbai High Court) न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे (Justice Revati Mohite Dere) आणि माधव जामदार (Madhav Jamdar) यांच्या खंडपीठाने त्यांचा निर्णय सुनावला. (Bombay High Court)

 

कुंभकोणी यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सांगितले, विशेष महानिरीक्षक (नाशिक) (Special Inspector General Nashik) महिलेची पात्रता लक्षात घेऊन राज्याच्या गृह विभागाच्या (Maharashtra Home Department) अतिरिक्त मुख्य सचिवांना (Additional Chief Secretary) शिफारस सादर करतील. तसेच याचिकाकर्त्या महिलेसाठी नोकरी आणि लाभाच्या अटी तिच्या स्तरावर सर्व कर्मचाऱ्यांच्याप्रमाणे असतील, ज्यांची मानक प्रक्रियेनुसार भरती केली जाते.

 

खंडपीठाने राज्य सरकारचा युक्तीवाद स्वीकारला आणि राज्य सरकार व पोलीस विभागाला (Maharashtra Police) संबंधित भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली. हा आदेश देताना खंडपीठाने म्हटले, हे अत्यंत दुर्दैवी प्रकरण आहे. याचिकाकर्त्यामध्ये कोणताही दोष आढळून शकत नाही, कारण तिने एक स्त्री म्हणून आपली कारकीर्द घडवली आहे.

 

काय आहे प्रकरण?

 

नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2018 (Nashik Rural Police Recruitment 2018) साठी अनुसूचित जाती
(SC) प्रवर्गात अर्ज केलेल्या 23 वर्षाच्या महिलेच्या याचिकेवर ही सुनावणी सुरु होती.
लेखी आणि शारिरीक चाचणीमध्ये संबंधित महिला उत्तीर्ण झाली.
परंतु त्यानंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीमध्ये तिला गर्भाशय आणि अंडाशय नसल्याचे स्पष्ट झाले.
दुसऱ्या चाचणीत तिच्यामध्ये नर आणि मादी असे दोन्ही गुणसुत्र असल्याचे उघड झाले आणि ती ‘पुरुष’ असल्याचे म्हटले.

 

यानंतर संबंधित महिलेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत सांगितले, तिच्या शरिराविषयी झालेल्या बदलांबाबत तिला काहीच माहिती नाही.
आपण जन्मापासून स्त्री म्हणून जगत आहोत. तिचे सर्व शिक्षण प्रमाणपत्रे व वैयक्तिक कागदपत्रे ‘महिला’ म्हणूनच असल्याचे तिने न्यायालयाला सांगितले.
केवळ ‘कॅरियोटाइपिंग क्रोमोसोम’ (Karyotyping chromosome) चाचणीने पुरुष असल्याचे घोषित केल्याने ही भरती नाकारण्यात येऊ नये, असे तिने म्हटले होते.

 

Web Title :- Mumbai High Court | in the medical examination she became he the court directed to give her a job in the police department

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anemia Problem | अ‍ॅनिमियाची समस्या असेल तेव्हा काय खावे आणि काय करावे, जाणून घ्या

BKU Expelled Rakesh Tikait | भारतीय किसान यूनियनमधून राकेश टिकेत OUT, संघटनेत झाले मोठे फेरबदल

Stock Market Outlook | या आठवड्यात शेअर बाजाराची कशी असेल वाटचाल? ‘हे’ फॅक्टर्स करतील परिणाम, जाणून घ्या एक्सपर्टचा मत