Mumbai High Court | फुरसुंगीच्या पाणी योजनेचे शपथपत्र सादर करा ! उच्च न्यायालयाचे जीवन प्राधिकरणाला आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai High Court | फुरसुंगीच्या पाणी पुरवठा योजनेसंदर्भात (Fursungi Water Supply Scheme) दोन आठवड्यात शपथपत्र सादर करा असे आदेश उच्च न्यायालयाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला (Maharashtra Jeevan Pradhikaran) दिले आहे. उर्वरीत काम कधी पुर्ण होईल याबाबतही न्यायालयाने विचारणा केली आहे. (Mumbai High Court)

 

फुरसुंगी आणि उरुळी देवाची (Uruli Devachi) या गावांतील पाणी पुरवठा योजना करण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत केले जात आहे. या कामाची निविदा प्रक्रीया २०१४ मध्ये झाली तर, २०१७ मध्ये काम सुरु करण्याचे आदेश दिले गेले होते. योजनेचे काम दोन वर्षात पुर्ण करण्याची मुदत होती. ही मुदत संपुन चार वर्षे उलटली तर काम पुर्ण झाले नाही. फुरसुंगी गावाचा चार वर्षापुर्वी महापालिकेच्या हद्दीत समावेश केला गेला. अद्याप पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने फुरसुंगी येथील रणजित रासकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

 

महाराष्ट्र राज्याचे सचिव व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,आयुक्त पुणे महानगरपालिका, अधिक्षक अभियंता पाणी पुरवठा विभाग पुणे महानगरपालिका (PMC Water Supply Department) यांना याचिकेत प्रतिवादी केले आहे. रासकर यांच्यावतीने मनीष केळकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. उच्च न्यायालयाने लवकरात लवकर या परिसराला पाणी पुरवठा देण्याचे आदेश दिले आहेत. याचिकेवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वकिलांनी योजनेच्या कामाची माहीती न्यायालयात दिली. सुमारे ३५ एमएलडी इतके पाणी या भागाला दिले जाणार आहे. योजनेचे ८० टक्के काम पुर्ण झाले आहे, उर्वरीत काम पुर्ण होण्यास नऊ महीन्याचा कालावधी लागेल असा दावा वकिलांनी केला होता. त्यावर न्यायालयाने शपथपत्र सादर करण्यास सांगितले आहे. (Mumbai High Court)

– टँकरची संख्या वाढवा 
प्रकल्पाचे काम पूर्ण होईपर्यंत पाण्याच्या टँकरची संख्या वाढवावी, असे न्यायालयाने (Bombay High Court) आदेश दिले आहेत. महापालिकेने योजना पूर्णपणे कार्यान्वित होईपर्यत अतिरिक्त पाणी कशापध्दतीने व कधी पासून पुरविले जाईल याचे स्पष्टीकऱण न्यायालयाने पालिकेला (Pune Municipal Corporation) मागितले आहे.

 

– निधी येणे बाकी 
योजनेचा वाढीव खर्च सुमारे ८६ कोटी ६४ लाख इतका झाला आहे. महापालिकेच्या वाट्यापैकी १३ कोी २४ लाख रुपयांपैकी ३ कोटी रुपये प्राधिकरणाला मिळाले आहे. तर राज्य सरकारकडून २५ कोटी रुपयांचा निधी अद्याप मिळालेला नाही.

 

फुरसुंगी पाणी पुरवठा योजना या जूनअखेर पूर्ण करण्याचे उद्दीष्ट महाराष्ट्र जीवन प्राधीकरणने ठेवले होते.
महापालिकेने आपल्या हिश्श्याचा बहुतांश निधी प्राधीकरणाला दिला देखिल आहे.
परंतू सोलापूर रस्त्यावरुन पाईपलाईन क्रॉसिंगमध्ये दोन ठिकाणी अडथळे निर्माण झाले आहेत.
याठिकाणी स्थानीक कार्यकर्त्यांकडून विरोध होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

Web Title :- Mumbai High Court | Submit Affidavit of Fursungi Water Supply Scheme! Mumbai Bombay High Court orders life authority

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anti Corruption Bureau (ACB) Satara | वीज जोडणीसाठी 12 हजार रुपये लाच घेताना ‘महावितरण’चा कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात

 

Maharashtra Monsoon Update | राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर; मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट – IMD

 

LIC Share Price | ‘एलआयसी’च्या शेअरमध्ये घसरणीमुळे निराश आहात, JP Morgan चा हा रिपोर्ट तुमची चिंता दूर करेल