Mumbai Minor Girl Gang Rape Case | मुंबई हादरली! लोअर परळमध्ये 15 वर्षीय मुलीवर सामूहीक बलात्कार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Minor Girl Gang Rape Case | लोअर परळमध्ये मुंबईला हादरवून सोडणारी घटना घडली. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 6 मुलांनी बलात्कार (Mumbai Crime) केला आहे. यातील तीन आरोपी अल्पवयीन आहेत. शुक्रवारी या मुलीवर सामुहीक बलात्कार करण्यात आला. यातील धक्कादाय प्रकार म्हणजे तीन आरोपी अल्पवयीन आहेत. पोलिसांनी सहाही जणांना ताब्यात घेतले असून, अल्पवयीन तीनही आरोपींना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 डिसेंबर रोजी लोअर परळमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहीक बलात्कार करण्यात आला. आरोपींमधील एक अल्पवयीन मुलगा या पीडितेचा मित्र आहे. पीडितेला घेऊन तो आपल्या मित्राच्या घरी गेला होता. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. (Mumbai Minor Girl Gang Rape Case)

तरुणीने घडलेला प्रसंग कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर पालकांनी एस एम जोशी पोलीस ठाण्यात धाव घेत या घटनेची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत पिडितेने दिलेल्या जबाबाच्या आधारे सहा आरोपींना ताब्यात घेतले. यातील तिघे अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. तर इतर तिघांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून पुरावे गोळा केले जात आहेत.

Web Title :- Mumbai Minor Girl Gang Rape Case | gang rape on 15 year old girl in lower parel mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jaykumar Gore Accident | भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात

Ram Setu | रामसेतू खरेच अस्तित्वात होता का? केंद्रीय मंत्री संसदेत म्हणाले…

GST | दुकानदारांसाठी महत्वाची बातमी! 31 डिसेंबरपूर्वी करा हे काम अन्यथा भरावा लागेल मोठा दंड