Mumbai MNS | ‘मनसे’ची मुंबईमध्ये पोस्टरबाजी ! खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे सरकार (Thackeray government) आणि त्यांचं पेंग्विन (Penguin) प्रेम सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. पेंग्विनच्या देखभालीसाठी ठाकरे सरकारकडून कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. पेंग्विनच्या देखभालीसाठी महापालिकेकडून निविदा काढण्यात आल्या आहेत. परंतु याला महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi government) मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसने (Congress) आक्षेप घेतला आहे. याच मुद्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (Mumbai MNS) ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मनसेने मुंबईमध्ये (Mumbai MNS) पेंग्विनच्या खर्चाचे पोस्टर लावून ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

मनसेकडून मुंबईतील वरळीसह (Worli) काही भागात पोस्ट लावण्यात आले आहेत. या पोस्टरवर शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. हा खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी आहे की पेंग्विन गँगसाठी आहे, असा टोला मनसेने लगावला आहे. मनसेसैनिक संतोष धुरी (Santosh Dhuri) यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन हे पोस्टर शेअर केलं आहे.
काँग्रेसचा खर्चाच्या निविदेला आक्षेप

भायखळा (Byculla) येथील वीर जिजाबाई भोसले उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील (Veer Jijabai Bhosale Udyan Zoo) पेंग्विनच्या देखभालीसाठी पालिकेने काढलेल्या निविदेला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. पालिकेकडे स्वत:चे पशुवैद्यक असताना डॉक्टरांची नियुक्ती का केली जात आहे, असा प्रश्न काँग्रेसचे नेते रवी राजा (Ravi Raja) यांनी उपस्थित केला आहे. पालिकेने काढलेल्या 15 कोटी रुपयांच्या निविदा या उधळपट्टी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

Crime News | एकटीला बघुन रुममध्ये घुसला अन्.., महिला IPS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत केलं विकृत कृत्य

तीन वर्षासाठी कंत्राट

पेंग्विन देखभालीसाठी (penguin maintenance) महापालिकेने 15 कोटी रुपये खर्चाच्या निविदा मागवल्या आहेत. तीन वर्षासाठी हे कंत्राट देण्यात येणार आहे. यामध्ये वैद्यकीय बाबींचाही समावेश करण्यात आला आहे. पालिकेकडे स्वत:चे पशुवैद्यक असताना खासगी डॉक्टरांच्या नियुक्तीला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. कोरोनाकाळात महापालिका अनावश्यक खर्च करत असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे. तसेच या निविदा रद्द कराव्यात अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी सांगितले की, पेंग्विन हे उद्यानाचं आकर्षण आहे. पेंग्विन वेगळ्या वातावरणात राहतात. त्यांची काळजी घेण्यास तडजोड केली तर त्यांच्या जिवावर बेतू शकते. त्यामुळे कोणतीही तडजोड केली जाणार नाही. विरोधकांना खर्चावर आक्षेप असेल तर त्याची माहिती घेऊ. मात्र, प्राणी संग्रहालयाच्या उत्पन्नात वाढ झाली असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.

मनसेकडून पोस्टरबाजी

मनसेने लावलेल्या पोस्टरवर पेंग्विनच्या खर्चा तपशील दिली आहे. तसेच एवढा खर्च पेंग्विन ना पोसण्यासाठी की पेंग्विन गँगला पोसण्यासाठी ? असा सवाल केला आहे.

(One day) एका दिवसाचा एका पेंग्विनचा खर्च – 20 हजार रुपये
(One day) एका दिवसाचा 7 पेंग्विनचा खर्च – दीड लाख रुपये
(One Month) एका महिन्याचा एका पेंग्विनचा खर्च – 6 लाख रुपये
(One Month) एका महिन्याचा 7 पेंग्विनचा खर्च – 42 लाख रुपये
(One Year) एका वर्षाचा एका पेंग्विनचा खर्च – 71 लाख रुपये
(One Year)एका वर्षाचा 7 पेंग्विनचा खर्च – 5 कोटी रुपये
एकूण 3 वर्षासाठी 7 पेंग्विनचा खर्च – 15 कोटी रुपये

हे देखील वाचा

MP Sambhaji Raje | खा. संभाजीराजेंचा राज्य सरकारला इशारा; म्हणाले – ‘…तर त्याला मी जबाबदार राहणार नाही’

Rupali Chakankar | BJP खासदाराच्या सुनेला मारहाण; सुनेच्या मदतीसाठी धावल्या राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Mumbai MNS | expenses for penguins in mumbai mns slams maharashtra government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update