Mumbai NCB | जळगाव जिल्ह्यात 1500 किलोचा गांजा जप्त; मुंबई NCB पथकांची कारवाई

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai NCB | मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावर (Mumbai Cruise Drugs Case) काही दिवसांपुर्वी अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) मोठी कारवाई केली. यामुळे राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर, आता मुंबई एनसीबी (Mumbai NCB) पथकाकडून 1500 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील एरंडोल याठिकाणी करण्यात आली आहे.

आंध्र प्रदेशच्या विखाशापट्टणम येथून हा गांजा विक्रीसाठी महाराष्ट्रात आणण्यात आला होता.
याबाबत मुंबई अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या पथकाला खब-याकडून माहिती मिळाली.
या माहितीनूसार ही कारवाई करण्यात आली आहे.
ट्रकमधून वाहतूक करणाऱ्यात येत असलेला गांजा पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी दोघां जणांना अटक (Arrested) करुन त्यांच्याकडून तब्बल 1500 किलोचा गांजा हस्तगत केला आहे.

या दरम्यान, काही दिवसांपूर्वीच श्रीनगरमधून 24 किलो चरस आणून मुंबईला पुरवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करण्यात आला. याप्रकरणी टोळीला अटक करुन त्यांच्याकडून 24 किलो चरस जप्त करण्यात आला होता. म्हणजेच 14 कोटी 40 हजाराचा माल जप्त करण्यात आला होता.

हे देखील वाचा

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

Amazon | अ‍ॅमेझॉनवर कढीपत्त्याच्या नावाखाली गांजाची तस्करी, पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश; जाणून घ्या प्रकरण

Sukanya Samriddhi Yojana | सरकारच्या ‘या’ स्कीम अंतर्गत तुमच्या मुलीला मिळतील पूर्ण 15 लाख रुपये, विवाह किंवा शिक्षण कुठेही करू शकता वापर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Mumbai NCB | jalgaon mumbai ncb team seizes 1500 kgs of ganja being smuggled from andhra pradesh see pics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update