मुंबईत 4 मजली इमारतीचा भाग कोसळला; वांद्रे परिसरातील घटनेत एकाचा मृत्यु, चौघे जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत रात्री उशिरा मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली त्याबरोबरच इमारती दुर्घटनाही घडली ( building collapses in bandra ) आहे. वांद्रेमधील खेरवाडी परिसरातील रझाक चाळीत चार मजली घराचा भाग कोसळला ( building collapses in bandra ). त्यात एका तरुणाचा मृत्यु झाला असून चौघे जण जखमी झाले आहेत. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

वांद्रे पश्चिम रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या रझाक चाळीत दाटीवाटीने घरे बनवलेली आहे.
जिथे घराचा भाग कोसळला ती जागा अतिशय चिंचोळी आहे. दुर्घटना घडली.
त्यावेळी मुंबईत जोरदार पाऊसही सुरु होता.
परिणामी अग्निशमन दलाच्या जवानांना ढिगारा हटवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. अग्निशमन दलाचे जवान ढिगारा हटवण्याचे काम करीत आहेत.
ढिगार्‍याखाली कोणी अडकलेले नाही ना याची खातरजमा केली जात आहे.

अपघातानंतर येथील आमदार झिशान सिद्दीकी यांनी या ठिकाणी भेट दिली. त्यांनी सांगितले की, मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून त्यात एकाचा मृत्यु झाला आहे. चार जण जखमी झाले असून जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाऊस सुरु असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून परिसरातील वीज पुरवठा तात्पुरता खंडीत करण्यात आला आहे. स्थानिक तरुणांनी मानवी साखळी करुन ढिगारा हलविण्यासाठी अग्निशामन दलाला मदत करत आहेत.

नसरीन बोलल्या; म्हणाल्या – ‘पतीशी पटत नसेल तर घटस्फोट घ्यावा’

Maratha Reservation | मराठा समन्वयक संभाजीराजेंच्या पाठीशी, म्हणाले – ‘राजेंवर टीका म्हणजे मराठा समाजावर टीका, आम्ही शांत बसणार नाही’