‘MSC’ बँक घोटाळयाच्या तपासासाठी ‘SIT’ ! अजित पवारांसह ‘या’ 18 नेत्यांवर ‘एवढया’ कोटींचं कर्ज, जाणून घ्या

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची म्हणजेच एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. राज्य बँक घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 76 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तपास प्रकरणात पोलिस उपायुक्त हे या विशेष तपास पथकाचे प्रमुख असणार आहेत.

राज्य बँक घोटाळ्याप्रकरणी सोमवारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात विविध राजकीय पक्षांचे नेते सहभागी असून या घोटाळ्यामुळे बँकेला जवळपास 25 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा तक्रारकर्त्यानी आपल्या तक्रारीत केला होता. 2007 ते 2010 या कालावधीत हा घोटाळा करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांसह संचालक मंडळाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.

7 प्रकारे झाला राज्य सहकारी बँक घोटाळा

1. बँकेच्या संचालक मंडळाने नाबार्डच्या सूचनांचे उल्लंघन करून कर्जपुरवठा केला.
2. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करून 9 साखर कारखान्यांना 331 कोटींचे कर्ज दिले.
3. अनेक साखर कारखान्यांकडे 225 कोटी रुपयांचे थकीत कर्ज.
4. लघुउदयॊजकांना दिलेल्या कर्जामुळे बँकेचे 3 कोटींचे नुकसान.
5. अनेक सूतगिरण्यांना जवळपास 60 कोटी रुपयांचे कर्ज.
6. कर्जवसुलीमध्ये मालमत्ता विक्री करून देखील जवळपास 500 कोटी रुपयांचे बँकेचे नुकसान.
7. केन एग्रो इंडियामुळे 19 कोटींचा तोटा.

शरद पवार देखील अडचणीत ?

या प्रकरणात तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे देखील नाव येण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यात संबंधित खात्याचे अधिकारी आणि तत्कालीन मंत्र्यांची नावंही आरोपी म्हणून देण्यात आल्याचा दावा तक्रारदाराच्या वकिल माधवी अय्यपम यांनी केला आहे. त्यामुळे तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

कोणत्या नेत्यावर किती कर्ज ?

बाळासाहेब सरनाईक – 24 कोटी रुपये
अजित पवार – 24 कोटी रुपये
दिलीप देशमुख – 23 कोटी रुपये
जयंत पाटील – 22 कोटी रुपये
जयवंत आवळे – 17 कोटी रुपये
राजेंद्र शिंगणे – 17 कोटी रुपये
मीनाक्षी पाटील – 12 कोटी रुपये
राहुल मोटे – 4 कोटी रुपये
रजनीताई पाटील – 4 कोटी रुपये
शिवाजीराव नलावडे – 34 कोटी रुपये
प्रसाद तनपुरे – 20 कोटी रुपये
जगन्नाथ पाटील – 20 कोटी रुपये
गंगाधर कुटुंरकर – 20 कोटी रुपये
मदन पाटील – 18 कोटी रुपये
राजवर्धन कदमबांडे – 25 कोटी रुपये
तुकाराम दिघोळे – 22 कोटी रुपये
मधुकरराव चव्हाण – 21 कोटी रुपये
आनंदराव आडसूळ – 21 कोटी रुपये

आरोग्यविषयक वृत्त –