Mumbai Pollution | आदित्य ठाकरेंमुळे वाढले मुंबईचे प्रदूषण; आशिष शेलारांचा हास्यास्पद आरोप

मुंबई : Mumbai Pollution | ठाकरे सरकारने (Thackeray Government) सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम आरे जंगलात (Aarey Forest) सुरू असलेली झाडांची कत्तल थांबवली होती. शिवाय आरे मेट्रो कारशेडला (Aray Metro Car Shed) विरोध केला होता. मात्र, फडणवीस सरकारने (Fadnavis Government) सत्तेत येताच आरे जंगल मेट्रो कारशेडसाठी खुले करून दिले आणि पुन्हा येथे भयंकर प्रमाणात झाडांची कत्तल सुरू झाली. मात्र, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यामुळे मुंबईचे प्रदूषण (Mumbai Pollution) वाढले आहे, असा हास्यास्पद आरोप केला आहे.

भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी आरोप केला आहे की, तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कागदावर ‘आरे’ला जंगल म्हणून घोषित केले. प्रत्यक्षात मुंबईत विकसकांना ‍प्रीमियमची खैरात करून सिमेंट काँक्रीटचे जंगल उभे केले. त्याचे परिणाम आता मुंबईकरांना भोगावे लागत आहेत.

शेलार यांनी म्हटले की, मुंबईतील हवेतील प्रदूषणाला तत्कालिन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जबाबदार आहेत. ठाकरे गटाकडून मुंबईत बिल्डरांसाठी मागील १० वर्षांत सुमारे ३८ हजार ९९९ झाडांची कत्तल करण्यास परवानगी दिली.

शेलार यांनी पुढे म्हटले की, प्रीमियमची खैरात वाटल्यामुळे मुंबईत एकाच वेळी ६ हजार बांधकाम प्रकल्प सुरू झाले.
मेट्रो आणि तिच्या कारशेडचे काम ठाकरे गटाने रोखून ठेवले. तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे
सरकारने (Uddhav Thackeray Government) प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना राष्ट्रीय हरित लवादाने ठोठावलेल्या १४ हजार कोटींच्या दंडात सवलत देऊन तो ३०० कोटींवर आणला आणि त्यालाही स्थगिती दिली. (Mumbai Pollution)

विशेष म्हणजे, ठाकरे गटाकडून मुंबईत बिल्डरांसाठी मागील १० वर्षांत सुमारे ३८ हजार ९९९ झाडांची कत्तल
करण्यास परवानगी दिली, असाही हास्यास्पद आरोप शेलार यांनी केला आहे. मुळात १० वर्षे ठाकरे सरकार नव्हते.
भाजपाचेच (BJP) सरकार सर्वाधिक काळ होते. तरी सुद्धा शेलार यांनी हा आरोप केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Govt Employees News | नोकरशहांवर सरकार मेहरबान, कारसाठी आता मिळणार १५ लाख रुपये; GR निघाला

Pimpri PCMC News | पिंपरी-चिंचवडला 2025 नंतरच दररोज पाणी मिळणार – मनपा आयुक्त शेखर सिंह

Modi Government | ओळख अथवा विवाहित असल्याचे लपवून संबंध ठेवल्यास १० वर्षांची शिक्षा, मोदी सरकार नवा कायदा करण्याच्या तयारीत

NCP MP Supriya Sule | महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधान कोणावर टीका करणार? अर्थातच…, मोदींच्या शरद पवारांवरील टीकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर