मुंबई-पुणे एक्सप्रेस वे गुरुवारी २ तास राहणार बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई –पुणे एक्सप्रेस वेवर ओव्हरहेड गँट्री टाकण्यासाठी उद्या गुरुवारी दुपारी १२ ते २ या दरम्यान मुंबईकडून पुण्याकडे जाणारा एक्सप्रेस वे दोन तास बंद राहणार आहे.

मुंबई -पुणे एक्सप्रेस वे वरील सध्यस्थिती समजावी, घाट परिसरात वाहतूक कोंडी आहे की नाही, याची वाहनचालकांना अगोदरच कल्पना येण्यासाठी मार्गाची माहिती देणारा इलेक्ट्रॉनिक फलक लावण्याचे काम सुरु आहे. हा फलक लावण्यासाठी उद्या महामार्ग २ तास बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत वाहनचालकांनी एक्सप्रेस वेवरुन कळंबोली सर्कल, उरण बायपास रोड, टी पॉर्इंट, पळस्पे फाटा, कोन, कोन ब्रीज व तेथून एक्सप्रेस वेवर यावे.

किंवा कळंबोली सर्कल, खांदा कॉलनी सिग्नल, पनवेल ओव्हर ब्रीज व तेथून एक्सप्रेस वेवर वळावे असे सांगण्यात आले आहे.