Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतुक कोंडी, वाहतूक सुरळीत होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. विकेंडमुळे लोकांच्या वाहनांची गर्दी झाल्याने महामार्गावर कोंडी झाली आहे. तळेगाव टोल नाका ते लोणावळा पर्यंत वाहतूक कोंडी आहे. लोणावळा घाटात देखील वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. (Mumbai-Pune Expressway)

विकेंड मुळे नागरिक घराबाहेर पडले आहेत. परिणामी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यात छोटासा अपघात झाल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे. या अपघातामुळे बोरघाटात वाहतूक संथ गतीने सुरु आहे. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. तळेगाव टोल नाका ते लोणावळा या दरम्यान वाहतूक कोंडी झाली आहे. (Mumbai-Pune Expressway

वाहतुक कोंडीमुळे महामार्गावर वाहतूक संथ गतीने पुढे सरकत आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी पुढील दोन ते तीन तासांचा वेळ लागण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गेल्या दोन दिवसांत पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे वर्षाविहार करण्यासाठी आणि शनिवार-रविवार लागून सुट्टी आल्याने अनेक लोक घराबाहेर पडले आहेत. मात्र, त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dr Neelam Gorhe | डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘ ऐसपैस गप्पा नीलमताईंशी’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते बुधवारी प्रकाशन

Ajit Pawar On NCP Party Symbol | पक्ष आणि चिन्ह कुणाला मिळणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले – ‘निवडणूक आयोग…’

Maharashtra MLA Disqualification Case | आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निर्णय लवकरच, कशी होणार सुनावणी?

MSRTC Employees Strike In Maharashtra | प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी पुन्हा संपावर जाणार, राज्यभर संप करण्याचा कर्मचारी संघटनेचा इशारा

Detox Drink | सकाळी बिछान्यातून उठल्यानंतर प्या ‘हे’ जादुई ड्रिंक, 20 मिनिटात शरीरातून बाहेर पडेल सर्व घाण!