Mumbai-Pune Highway Accident | मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; मायलेकीचा जागीच मृत्यू तर बापलेक गंभीर जखमी

पिंपरी – चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai-Pune Highway Accident | जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर भीषण अपघात (Mumbai-Pune Highway Accident) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टूव्हिलर वरून (Two – Wheeler) जाणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांना कंटेनरने (Container) धडक दिल्याने हा अपघात झाला. किवळे- देहूरोड (Kiwale- Dehu Road) परिसरात ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये आई आणि मुलीचा जागीच मृत्यू (Died) झाला आहे. तर वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. (Dehu Road Accident News)

 

किवळे – देहूरोड परिसरात झालेल्या या अपघातामध्ये आई आणि मुलीचा मृत्यू झाला असून त्यांचे नावे अद्याप समोर आले नाहीत. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आई आणि मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. (Mumbai-Pune Highway Accident)

 

या दरम्यान, या भीषण अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या अपघातामध्ये आई आणि मुलीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

 

Web Title :- Mumbai-Pune Highway Accident | old mumbai pune highway accident mother and daughter passed away 2 injured

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा