पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोणावळ्यातून (Lonavala) जाणाऱ्या जुन्या मुंबई – पुणे महामार्गावरील (Mumbai-Pune Highway) वाहतूक वाढल्याने परिणामी वाहतूक कोंडी (Traffic Jam) आणि अपघातांचे (Accident) प्रमाण वाढले आहे. यामुळे लोणावळा शहरातील नागरिकांनी या मार्गावरुन होणारी अवजड वाहनांची वाहतूक (Heavy Vehicles) बंद (No – Entry) करण्याची मागणी केली होती. नागरिकांची मागणी प्रशासनाने मान्य केली असून मुंबई पुणे महामार्गावर (Mumbai – Pune Highway) सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
लोणावळा शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई – पुणे महामार्गावरुन (Mumbai – Pune Highway) अवजड वाहनांची वाहतूक वाढली आहे.
त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
यामुळे लोणावळा शहरातील नागरिक तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी (All – Party Activists) शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी केली होती.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) आणि पुणे ग्रामीण (Pune Rural Police) पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) यांना निवेदन दिले होते.
त्यानुसार शुक्रवार (दि.18) पासून सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
—
#Mumbai–#Pune_Highway | लोणावळ्यातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर 'या' वेळेत अवजड वाहनांना 'नो-एन्ट्री' @Policenama1 #policenama #Lonavala_City pic.twitter.com/wWG6ciDteP
— Policenama (@Policenama1) March 17, 2022
लोणावळा शहर हे थंड हवेचे ठिकाण (Hill Station) म्हणून ओळखले जाते.
या ठिकाणी राज्यासह परदेशातून देखील पर्यटक (Tourist) येत असतात.
लोणावळा शहरातूनच जुना मुंबई – पुणे महामार्ग जातो. या मार्गावरुन अवजड वाहने जात असल्याने लोणावळा शहरात वाहतूक कोंडी आणि अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करावी या मागणीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Andolan) केले होते.
यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते.
Web Title :- Mumbai-Pune Highway | In this time No entry for heavy vehicles on old Mumbai Pune highway at Lonavala
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update