मुंबईकरांच्या Covid-19 लढ्याला मोठं यश, आजची रुग्णसंख्या 1000 च्या आत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील कोरोना (Covid-19 ) विरोधातील लढ्याला मोठे यश येताना दिसून येत आहे. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने पसरली तशी ओसरत देखील आहे. मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या एक हजाराच्या खाली आली आहे. गेल्या 24 तासात मुंबई महापालिका क्षेत्रात 929 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 239 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

मुंबईत आज (शुक्रवार) 30 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आजची संख्या कमी आहे. दरम्यान, राज्यात मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोना मृत्यू झाले असून आजपर्यंत 14 हजार 808 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईतील दैनंदिन रुग्ण संख्या 11 हजार पर्यंत पोहचली होती. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. मात्र, प्रशासनाने अहोरात्र कष्ट घेऊन कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे.

मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 14 तासांमध्ये मुंबईत 929 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्याचवेळी 1 हजार 239 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मुंबईत आज 30 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यात 14 रुग्ण सहव्याधीग्रस्त होते. मृतांमध्ये 6 रुग्ण 40 वर्षाखालील, 8 रुग्ण 40-60 वयोगटातील तर 16 रुग्ण 60 वर्षावरील होते. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के इतके आहे. तर 21 ते 27 मे या कालावधीत रुग्णवाढीचा दर 0.18 टक्के इतका राहिला आहे. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी आता 370 दिवसांवर पोहचला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात आज 29 हजार 573 चाचण्या घेण्यात आल्या. मुंबईत सध्या चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये 41 सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर 175 इमारती सील करण्यात आल्या आहेत.

Also Read This : 

Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 31,671 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 93.24 %

 

मुलांना तंदुरूस्त ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनात समाविष्ट करा ‘हे’ योगासन

 

Aadhaar कार्ड Lock करण्याची सोपी पद्धत, असे करा लॉक; तुमची माहिती राहिल सुरक्षित, जाणून घ्या

 

जेवणानंतरही तुम्ही ‘हे’ आसन करू शकता, ‘हे’ आहेत फायदे

 

बाबा रामदेव यांच्या भूमिकेला भाजप आमदाराचा पाठिंबा, म्हणाले – ‘ॲलोपॅथी क्षेत्रातील डॉक्टर्स राक्षसांसारखे काम करताहेत’