‘या’ विमानतळावरील फलकावर झळकले महाराजांचे नाव 

मुंबई : वृत्तसंस्था- विलेपार्ले येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर असलेल्या मुख्य फलकावर अखेर ‘महाराज’ उपाधीचा उल्लेख असलेला नवीन फलक लावण्यात आलेला आहे. या कामगिरीमुळे शिवप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे दिसत आहे. जीव्हीके प्रशासनाकडून  फलकावर नावाचा उल्लेख करण्याकडे कानाडोळा केला जात होता. परंतु अखेर  ‘महाराज’ उपाधीचा उल्लेख असलेला नवीन फलक लावला गेला आहे.

विलेपार्ले येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळला महाराज उपाधी देऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला होता. तरीही ‘महाराज’ उपाधीचा उल्लेख असलेला फलक मात्र लावला गेला नव्हता. इतकेच नाही तर, जीव्हीके प्रशासनाकडून  फलकावर नावाचा उल्लेख करण्याकडे कानाडोळा केला जात होता. दुसरीकडे कामही संथगतीने सुरू असल्याचे चित्र दिसत होते. परंतु आता येथे नवीन फलक लावण्यात आला आहे. यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार,  शिवसेना, भाजपा आणि वॉचडॉग फाऊंडेशनचे अध्यक्ष निकलोस अल्मेडा आणि अ‍ॅड. गॉडफ्री पिमेटा यांनीही प्रयत्न केले.  उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी पावसाळी अधिवेशनात संसदेत आवाज उठवून सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर केंद्रीय उड्डाणमंत्री सुरेश प्रभू आणि नगर विमानमंत्री अशोक गजपती यांना निवेदन देवून विमानतळाला 15 दिवसांत ‘महाराज’ उपाधी दिली होती.