मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार अखेर उद्या ? ; ‘या’ दिग्गजांची ‘वर्णी’ लागणार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार उद्या म्हणजेच बुधवारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या मंत्रिमंडळाचा अंतिम विस्तार होऊ शकतो. १७ जूनपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होत असून त्याआधी हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचेच बोलले जात आहे. या विस्तारात भाजपचे पाच आणि शिवसेनेचा एक आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्याचबरोबर विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उतावळे असलेले काँग्रेसचे माजी नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेससह माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा देखील शपथविधी होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या कोट्यातून कोल्हापूर जिल्ह्यातून राजेश क्षीरसागर आणि सुजित मिणचेकर यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जयदत्त क्षीरसागर यांना संधी

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधून नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेले जयदत्त क्षीरसागर यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा रंगत आहे, त्यामुळे नक्की कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार हे लवकरच स्पष्ट होईल.

आरोग्यविषयक वृत्त –

डिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी ; ‘ह्या’ सात सोप्या पद्धती

गरोदरपणा नंतरचा लठ्ठपणा नको ? मग ‘हे’ पाणी प्या

लठ्ठपणामुळे होऊ शकतात ‘हे’ १० गंभीर आजार

‘बल्जिंग डिस्क’ आजार माहीत आहे? जाणून घ्या कारणे

You might also like