Shivsena Eknath Shinde Group नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी हक्क सांगू लागल्याने शिंदे गटाचा नेता संतापला, ”शिंदेंनी सगळ्या जागा सोडायचं मान्य केलं का?”

नाशिक : रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिकसह इतर काही जागांवर राष्ट्रवादी (NCP Ajjit Pawar Group) आणि भाजपा हक्क सांगू लागल्याने शिंदे गटात (Shivsena Eknath Shinde Group) अस्वस्थता आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शांत असल्याने नेतेही बेचैन आहेत. शिंदेंच्या निम्म्याच विद्यमान खासदारांना आतापर्यंत उमेदवारी मिळाली आहे. अशावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नाशिकच्या जागेवर हक्क सांगितल्याने शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी संताप व्यक्त केला आहे.

नाशिकची जागा (Nashik Seat) शिंदे गटाला मिळायला हवी, हा नाशिककरांचा आग्रह असल्याचा दावा पालकमंत्री दादा भुसे यांनी केला होता. हा दावा छगन भुजबळ यांनी लगेचच खोडून काढला. यावरून आता ठाकरे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला. शिरुरची जागा तुम्हाला दिली आहे. आम्ही आमच्या जागा लढवू. रत्नागिरीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेतील, असे संजय शिरसाट म्हणाले.

प्रफुल पटेल यांनी नाशिकच्या जागेवरून म्हटले होते की, येथील निर्णय झालेला नाही. कोणी उड्या मारू नये.
यावर संजय शिरसाट म्हणाले, त्यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांना हे सांगितले तर बरे होईल.
तेथील खासदाराला डिवचण्यासाठी काही लोक ही मागणी करत आहेत. तिथे शिवसेनेचा विद्यमान खासदार असल्याने ही जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. ती जागा आम्ही मिळवणार यात शंका नाही. हा आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cheating Fraud Case Pune | पुणे : आयटी अभियंता तरुणीला 14 लाखांचा गंडा, स्काईप आयडीवरून अंगावरील तीळ दाखवण्यास भाग पाडले

Shirur Lok Sabha | आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील दोन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण

Amol Kolhe On Ajit Pawar | पलटी सम्राट आणि खोके सम्राटपेक्षा नटसम्राट कधीही चांगलं डॉ. अमोल कोल्हे यांचा अजितदादांवर प्रतिहल्ला

BJP MLA Mangesh Chavan | भाजपा आमदाराचं खळबळजनक वक्तव्य, ”मंत्रालयातील तिजोरीचा चावीवाला आपला दोस्त, पाहिजे तेव्हा…”, फडणवीसांचाही उल्लेख

Pune News | केएसबी पंप ने कृषी आणि घरगुती पंपांची नवीन श्रेणी केली लॉन्च