Shirur Lok Sabha | आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील दोन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शिरुर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत (Shirur Lok Sabha) आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील (Ambegaon Vidhan Sabha) मतदान केंद्रावर नियुक्त २ हजार २७३ क्षेत्रीय अधिकारी, समन्वय अधिकारी, मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करणारे केंद्रप्रमुख व सहाय्यक अधिकारी कर्मचारी यांना मतदान प्रक्रिया, ईव्हीएम (EVM) व व्हीव्हीपॅट (VVPAT) हाताळणीबाबत अवसरी येथील तंत्रनिकेतनच्या सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे, आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.(Shirur Lok Sabha )

दोन सत्रात पार पडलेल्या या प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना श्री. शिंदे यांनी अधिकारी व कर्मचारी यांची मतदानाच्या आदल्या दिवशी व प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचे कर्तव्य व अधिकार याबाबत माहिती दिली. कामकाज करताना होणाऱ्या चुका टाळण्याबाबत मार्गदर्शन करतांना निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे सर्वांनीच पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणूक कामकाज अत्यंत जबाबदारीने पार पाडावे आणि कर्तव्य करतांना प्रत्येक अधिकाऱ्याने गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रशिक्षण व प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीचे प्रात्यक्षिकात सर्व संबधितांनी सहभागी व्हावे. मतदान प्रक्रिया निष्पक्ष व खुल्या वातावरणात पार पाडण्यात येऊन मतदान करणाऱ्या मतदाराला केंद्रस्थानी मानून आपले राष्ट्रीय कर्तव्य प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडावे, असे आवाहन श्री.शिंदे यांनी केले.

प्रशिक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी मतदान यंत्राबाबत उपस्थितींना माहिती दिली.
प्रशिक्षण सत्रांमध्ये प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान यंत्रे स्वतः हाताळावीत.
प्रशिक्षणार्थींनी प्रात्यक्षिकाच्या आधारे मतदान प्रक्रियेची माहिती करून घ्यावी, यामुळे प्रत्यक्ष मतदानावेळी चुका
होणार नाहीत, अशी सूचना श्री.शिंदे यांनी केली. यावेळी सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंकांचे सादरीकरणाच्या माध्यमातून निरसन करण्यात आले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar-Bhushan Singh Holkar | शरद पवारांचे बेरजेचे राजकारण सुरूच, अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर राष्ट्रवादी प्रवेश करणार

Keshav Nagar Mundhwa Crime | पुणे : प्रेम संबंधामध्ये दुरावा, तरुणीला शिवीगाळ करुन मारहाण

Aba Bagul Meets Devendra Fadnavis | काँग्रेसच्या आबा बागुल यांचे मुलांच्या राजकीय पुनर्वसनाचे प्रयत्न दोन वर्षांनी प्रत्यक्षात ! बागुल यांनी घेतली फडणवीस, बावनकुळे यांची भेट