Mundhwa Pune Crime | पती ‘गे’ निघाल्यानंतर पत्नी पोचली पोलीस ठाण्यात, पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीमधील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mundhwa Pune Crime | लग्नानंतर आपला पती ‘गे’ (Gay) असल्याची धक्कादायक माहिती पत्नीला समजल्यावर तिला धक्काच बसला. याबाबत सासू व नणंद तसेच पतीने ‘गे’ असल्याची माहीत लग्न करण्यापूर्वी महिलेला सांगितली नाही. तरी देखील महिलेने दोन वर्ष संसार केला. मात्र, सासरच्या लोकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केल्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठून फसवणूक (Cheating Fraud Case) व छळाची तक्रार दिली. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 33 वर्षीय महिलेने बुधवारी (दि.17) मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन तिचा 30 वर्षीय पती, 64 वर्षीय सासू, वानवडी (Wanwadi) येथे राहणाऱ्या 40 वर्षीय नणंदेविरुद्ध आयपीसी 498 (अ), 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार वानवडी येथील एका उच्चभ्रू सोसायटीत जानेवारी 2022 ते 17 एप्रिल 2024 दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे लग्न जानेवारी 2022 मध्ये तीन वर्षांनी लहान असलेल्या कर्नाटकातील कारवार जिल्ह्यातील आरोपीसोबत झाले होते. लग्न ठरविताना सासरच्या लोकांनी मुलगा ‘गे’ असून त्याला पुरुषांमध्ये रस असल्याची माहीती तरुणीला व तिच्या कुटुंबीयांना दिली नाही. तसेच मुलगा ‘गे’ असल्याची माहिती समाजात समजली तर बदनामी होईल. बदनामी होऊ नये याकरिता फिर्यादीसोबत लग्नाचे नाटक केले.

याशिवाय फिर्यादी यांना घरातील सर्व कौटुंबिक खर्च करायला भाग पाडले.
आरोपीने आईचा खर्च करण्यास भाग पाडले. तसेच शीरीरसुखापासून वंचित ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
आरोपींनी किरकोळ कारणावरुन भांडण करुन फिर्यादीला शिवीगाळ करुन मारहाण केली.
तसेच, वारंवार मानसिक त्रास दिला. सासू आणि नणंदेने फिर्यादी यांना
‘आम्हाला तुझ्यापेक्षा श्रीमंत घरातील 40 तोळे सोने देणारी सून मिळाली असती.
तुझ्या मुळे माझ्या मुलाचे आयुष्य खराब झाले.’ असे म्हणत सतत टोमणे मारून शारीरिक व
मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मगदुम करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur Lok Sabha | अमोल कोल्हे यांनी शिरूरसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, जोरदार शक्तीप्रदर्शन (Video)

Baramati Lok Sahba | सुप्रिया सुळे यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला (Videos)

Ajit Pawar NCP MLA | अजित पवारांच्या आमदाराचे खळबळजनक वक्तव्य, सहा महिन्यानंतर महायुती तुटणार? बारणेंच्या अडचणी देखील वाढू शकतात