महापालिकेच्या ठेवी खाजगी बँकांमध्ये ठेवण्यास मनाई करावी

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

महापालिकेतील निधी खाजगी बँकांमध्ये ठेव म्हणून ठेवण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने केला आहे. हा निर्णय आता वादग्रस्त बनलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले असून या निर्णयाला मनाई करावी असे त्यात म्हटले आहे.

स्थायी समितीच्या माध्यमातून भाजपने हा निर्णय गुपचूपपणे मान्य करून घेतला. ठेवी ठेवण्याचा प्रस्ताव मान्य करत असताना ठेवींबाबतच्या महापालिकेच्या धोरणालाच हरताळ फासण्यात आला आहे. महापालिकेच्या ठेवी सरकारी बँकेमध्येच ठेवाव्यात असे धोरण १९८९ मध्ये ठरविण्यात आले. त्यानुसारच आत्तापर्यंत कार्यवाही होत आली होती. पालिकेत सत्ताबदल झाल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित जनता सहकारी बँकेमध्ये पालिकेच्या ठेवी ठेवण्याला भाजपने सुरूवात केली. ठरावात जनता बँकेचे नांव न घेता बहुमताच्या जोरावर तो ठराव मंजूर केला. ठराव मंजूर करताना पालिका आयुक्तांचा वापर करण्यात आला असे मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे.
[amazon_link asins=’B076Y4P7NQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fbb93ac3-86ab-11e8-872e-a1cab863f08b’][amazon_link asins=’B076Y4P7NQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fc7cb234-86ab-11e8-a20a-f3f7ceb65791′]

जनाता बँक काय किंवा अन्य खाजगी बँक आर्थिक संकटात सापडल्यास पालिकेच्या ठेवींची जबाबदारी कोण घेणार? पुणेकरांचा पैसा अशा रितीने वापरून एखादी बँक चालविणे अत्यंत चुकीचे आहे. पुणेकरांच्या पैशाच्या नुकसानीची शक्यता असल्याने चौकशी करून प्रसताव रद्द करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी निवेदनात केली आहे.