बीडमध्ये भरदिवसा शिक्षकाचा खून करणाऱ्याला पुण्यात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बीड शहरातील जयदत्त क्षीरसागर यांच्या सैनिक विद्यालयातील शिक्षकाचा दिवसाढवळ्या भोसकून खून केल्याची घटना गुरुवारी (दि.19) दुपारी तीनच्या सुमारास बालेपीर भागात घडली होती. या प्रकरणातील सराईत गुन्हेगाराला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई हडपसर रेल्वेगटजवळ करण्यात आली आहे. अमर अकबर शेख (वय-30 रा. बालेपीर, ता. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सय्यद साजेदअली मिर अनसारली असे खून झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. सय्यद अनसारली हे बीडमधील सैनिक विद्यालयामध्ये सहशिक्षक म्हणू कार्य़रत होते. किरकोळ कारणावरून त्यांचा भरदिवसा सपासप वार करून खून करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी अमर शेख हा फरार झाला होता. बीड येथील खुनातील आरोपी हडपसर येथील सय्यद नगर परिसरात राहण्यास असून तो रेल्वेगेटजवळ येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई नितीन मुंढे व पोलीस शिपाई शाहिद शेख यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर बीडमध्ये सात गुन्हे असून तो अन्वर उर्फ गुजर खान या टोळीचा सदस्य आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी बीड पोलिसांकडे देण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग सुनील फुलारी, परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त सहास बावचे, हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे हमराज कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस उप निरीक्षक युसुफ पठाण, पोलीस हवालदार राजेश नवले, पोलीस नाईक प्रताप गायकवाड, सैदोबा भोजराव, विनोद शिवले, गणेश दळवी, नितीन मुंढे, अकबर शेख, शाहीद शेख, गोविंद चिवळे, अमित कांबळे, विजय पवार यांच्या पथकाने केली.

Visit : policenama.com