Murder in Jalna | आधी दुचाकीला बांधून 400 मीटर फरफटलं, त्यानंतर झाडाला बांधून तरुणाचा खून

जालना (Jalna): पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – जालना जिल्ह्यातील (Jalna district) बदनापूर तालुक्यातील (Badnapur taluka) कुंभारी शिवारात बेपत्ता तरुणाचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला आहे. मृत तरुण हा बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव सायगाव (Dongargaon Saigaon) येथील रहिवासी असून त्याची फिल्मी स्टाईल हत्या (Murder in Jalna) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी (दि.3) कुंभारी शिवारातील भागवत बिडे (Bhagwat Bide) यांच्या शेतातील एका पडक्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. जालन्यात घडलेल्या या खुनाच्या (Murder in Jalna) घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

शिवाजी बाबासाहेब पितळे (Shivaji Babasaheb Pitle) (रा. डोंगरगाव सायगाव, ता. बदनापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, शिवाजीचा घातपात केल्याचा आरोप नागरिकांनी करुन काही काळ मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पोलिसांनी दोन तास नागरिकांची समजूत काढली. त्यानंतर मृत शिवाजीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरु केला आहे.

चोरीच्या संशयातून खून केल्याचा दावा

याप्रकरणी पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. परंतु मृत शिवाजी पितळे याच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत. मृत शिवाजीला चार अज्ञात युवकांनी विद्युत पंप चोरीच्या संशयातून मारहाण करुन त्याची हत्या केली (Beat and Murder) असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

दुचाकीला बांधून 400 मिटर फरफटत नेलं

आरोपींनी शिवाजीला आधी दुचाकीला बांधून (Tied to bike) चारशे मीटरपर्यंत फरफटत (pull
400 Meters) नेलं. त्यानंतर त्याला झाडाला बांधून बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू
झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी (accus) शिवाजीचा मृतदेह एका पडक्या विहिरीत फेकून
दिला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच 29 जून रोजी चार अज्ञात तरुणांनी शिवाजीचे
अपरहण केलं होंत असाही दावा कुटुंबीयांनी केला आहे. पुढील तपास पोलीस करित आहेत.

हे देखील वाचा

Why Joint Pain Increases in Pregnancy | प्रेग्नंट असताना कशामुळं वाढतं सांधेदुखीचं दुखणं? जाणून घ्या उपाय ज्याच्यामुळे मिळेल तात्काळ आराम

English medium school fee | पालक अन् विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! राज्यातील इंग्रजी शाळेच्या शुल्कात 25 टक्के कपात

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Murder in Jalna | first they tied to bike pull 400 meters then tied to tree and beat film style murder in jalna

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update