Murder In Nagpur | पोलीस ठाण्यात मोर्चा जाताच उलगडलं खूनाचं रहस्य, दोन जणांना केली अटक

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन पैशाच्या वाटणीतून झालेल्या वादाचा राग मनात धरून दोघांनी घरातच एकाचा रेल्वेरूळाच्या लोखंडी तुकड्यावर डोके आपटून खून (Murder In Nagpur) केला. त्यानंतर रात्रभर मृतदेह घरात ठेवून दुसऱ्यादिवशी मृतदेह पुरला (buried his dead body). मात्र, पाच दिवसानंतर कुटुंबासह मित्रपरिवाराने पोलीस ठाण्यावर (police station) मोर्चा नेला. त्यानंतर मात्र, या खूनाचे (Murder In Nagpur) रहस्य उलगडण्यात यश आले. उमरेड (Umred) येथील हा खळबळजनक प्रकार असून याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे.

ग्याना रूपराव शेंडे (वय- 23, रा. रेल्वे झोपडपट्टी, उमरेड) असे मृताचे नाव आहे.
विजय ऊर्फ गोलू सखाराम मांडले आणि त्याचा भाऊ सुरजित सखाराम मांडले (रा. झोपडपट्टी, उमरेड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
नागरिकांच्या सतर्कतेमुळे तब्बल पाच दिवसांनंतर हा गुन्हा उघडकीस आला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ग्याना शेंडे हा लोखंडी साहित्याची जुळवाजुळव करत विक्री करण्याचा धंदा करत होता.
तर गोलू व सुरजित मांडले माती खोदकाम करतात. तिघेही मित्र होते.
लोखंडी साहित्याची आपआपसात वाटाघाटी करत विल्हेवाट लावण्याचे काम तिघेही करत होते.
5 सप्टेंबरला दुपारी गोलू व सुरजित यांच्या घरी ग्याना शेंडे हा पार्टी करत होता.
त्याचवेळी पैशाच्या वाटाघाटी करून तिघांमध्ये वाद झाला.
गोलू आणि सुरजित यांना राग अनावर झाल्याने दोघांनी ग्यानाचे रेल्वेरूळाच्या लोखंडी तुकड्यावर डोके आपटून ठार केले. त्यानंतर रात्रभर घरातच मृतदेह ठेवला.
त्यानंतर दुसऱ्यादिवशी उमरेड सेवामार्गावरील (service route) आंबराई परिसरातील एका निर्जनस्थळी असलेल्या केबल वायरच्या खड्ड्यात ग्यानाचा मृतदेह पुरण्यात आला.
दरम्यान, ग्यानाचा मोठा भाऊ श्याम रूपराव शेंडे याने भाऊ हरविल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली.
मात्र, पोलिसांनी नेहमीप्रमाणे उत्तरे देत तपास करू असे सांगितले.

 

नागरिकांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

दोन दिवसानंतर ग्यानाचा शोध न लागल्याने झोपडपट्टीमधील लोक पोलीस ठाण्यात येण्यास सुरुवात झाली. काही नागरिकांनी ग्याना शेंडे याचा खून झाला असून आम्हास आरोपी गोलू व सुरजित यांच्यावर संशय असल्याचे सांगितले.
तरीही पोलिसांनी याची फारशी दखल घेतली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा तपास (Investigation) करण्यात येत नसल्याचे समोर आल्यानंतर नगरसेवक नागेश मानकर (Corporator Nagesh Mankar), रामसिंग लोंढे, गणेश पवार,
शेखर शिवनकर, गरीबा मानकर, बबन मानकर, नेवापाल पात्रे यांच्यासह झोपडपट्टीमधील नागरिकांनी शुक्रवारी दुपारी पोलीस ठाणे गाठले.
पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांना बोलवा, असा आग्रह धरत नागरिकांनी तपासाबाबत संताप व्यक्त केला.

पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली

दरम्यान, नागपूर जिल्हा ग्रामीणचे (Nagpur District Rural) अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर (Additional Superintendent of Police Rahul Makanikar) उमरेड येथे पोहोचले.
उपस्थित नागरिकांनी त्यांना निवेदन दिले. संशयितांची नावेही सांगितली.
त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने सहा संशयितांना ताब्यात घेतले. त्यामध्ये गोलू व सुरजित यांचाही समावेश होता.
पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही खुनाची कबुली दिली.
घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला (forensic squad) पाचारण करण्यात आले होते.
त्यांनी काही नमूने घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूर येथे पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता तपासी अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

 

Web Title : Murder in Nagpur | nagpur two brothers killed one buried his dead body

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gujarat CM | गुजरातचे नवे ‘CM’ कोण?, चंद्रकांत पाटील की नितीन पटेल? चर्चेला उधाण

Modi Government | नोकरीचे टेन्शन संपले ! मोदी सरकारच्या योजनेत अर्ज करून लवकर कमवा जास्त पैसे, जाणून घ्या

Pune BJP | घरकोंबड्या सरकारमुळेच अत्याचार वाढले; महिलांच्या सुरक्षेसाठी भाजपचे गणरायासमोर ‘साकडे आंदोलन’ ! (Video)