धक्कादायक ! पुण्यात मित्रानेच केला मित्राचा दगडाने ठेचुन खून

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – चिखली, शरदनगर येथे किरकोळ कारणावरून मित्राने मित्राच्या डोक्यात दगडाने मारहाण करुन खून केला. हा प्रकार बुधवारी मध्यरात्री घडली.

सनी मोहन घाटोळकर (१९, रा.हरगुडे वस्ती, स्पाईन रोड, चिखली) याचा खून झाला आहे. तर सोन्या उर्फ प्रतीक सुरेश मोरे (रा. शरदनगर, चिखली) याच्यावर संशय आहे.

चिखली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी आणि सोन्या दोघे मित्र आहेत. बुधवारी मध्यरात्री दोघे दारू पिऊन येत होते. यावेळी दोघांमध्ये वादावादी झाली. त्यावेळी सोन्या ने दगडाने ठेचुन सनीचा खून केला. रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर सोन्या पळुन गेला. गुरुवारी सकाळी चिखली पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यानंतर तपास पथके रवाना झाली आहेत. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Loading...
You might also like