पुण्यात प्रेमप्रकरणाची चौकशी करणाऱ्या पत्नीचा दगडाने ठेचून खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आंबेगाव तालुक्यातील गोऱ्हे खुर्द येथे दुसऱ्या महिलेशी असलेल्या प्रेम संबंधाचा संशय घेऊन वारंवार चौकशी करणाऱ्या पत्नीचे हात पाय बांधून दगडाने मारहाण करुन खून करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

संदीप सोमा करवंदे याने त्याची पत्नी सानिका संदीप करवंदे (वय २८) हिला काठी व दगडाने मारहाण करून तिचा खून केला.
याबाबत सानिकाची आई रेऊबाई गंगाराम तिटकारे (रा. नायफड) यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, संदीप करवंदे याचे दुसऱ्या महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय पत्नी सानिका करवंदे हिला होता. त्यामुळे ती संदीप यास त्याबाबत वारंवार विचारणा करीत होती. यावरून त्यांच्यामध्ये वाद होत होते. हा राग मनात धरून संदीप याने रविवारी दुपारी एकच्या सुमारास सानिका हिचे हात-पाय दोरीने बांधले व तिला घरातील लाकडी खांबाला बांधून काठी व दगडाने मारहाण केली. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. यानंतर संदीप करवंदे पळून गेला. घोडेगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Loading...
You might also like