Mumbai News : भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बहिणीने आरोपीला ओढले प्रेमाच्या जाळ्यात, नंतर झाले असे…

मुंबई : मुंबई (Mumbai ) पोलिसांनी एका तरूणाच्या हत्येचा प्रयत्न उधळवून लावत आरोपींना अटक केली आहे. हत्येचा कट फिल्मी स्टाइलमध्ये रचण्यात आला होता. या अटकेनंतर जो खुलासा झाला आहे त्यामुळे पोलीस सुद्धा हैराण झाले आहेत.

एका बहिणीने आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा कट रचला होता. मुलीने इंस्टाग्रामवर फेक आयडी बनवून मारेकर्‍याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. शनिवारी 9 जानेवारीला आरेच्या छोटा काश्मीर परसरात त्याला बोलावले. नंतर अ‍ॅम्ब्युलन्समध्ये तिने आपल्या पाच साथीदारांच्या मदतीने त्याचे अपहरण केले. परंतु, ती स्वत: घटनास्थळी पोहचली नाही. हे लोक नायगावच्या जंगलात जाऊन त्याची हत्या करणार होते, पण तत्पूर्वीच दहिसर चेक नाक्यावर सर्वांना आरे पोलिसांनी पकडले.

आरे पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, 9 जून 2020 ला एम. एम. कंपनी आणि साजिद 313 ग्रुपमध्ये रिक्षा पार्किंगवरून रक्तरंजीत हत्याकांड झाले होते. यामध्ये एम. एम. कंपनीचा मोहम्मद सादिक उर्फ मेंटल साजिद 313 ग्रुपच्या 24 वर्षीय अल्ताफ शेखची हत्या करून फरार झाला होता. तो दिल्लीत लपला होता. अल्ताफची बहिण यास्मीन हिला आपल्या भावाच्या मारेकर्‍याचा बदला घ्यायचा होता.

यासाठी तिने मालवणीत राहणारे आपल्या भावाचे मित्र मोहम्मद फारूख शेख (20 वर्ष), ओवेश नबिउल्लाह शेख (18 वर्ष), मोहम्मद मानिस सैयद (20 वर्ष) सह कांदिवलीच्या गणेश नगरमध्ये राहणारा निहाल जाकिर खान (32 वर्ष) आणि सत्यम कुमार पांडे (23 वर्ष) यांना आपल्या कटात सहभागी करून घेतले. यास्मीन स्वत: इंस्टाग्रामवर फेक आयडीच्या माध्यमातून सादिकला फॉलो करून चॅट करू लागली. प्रेमाच्या गोष्टी करून ती सादिकचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाली.

या प्रकाराची माहिती मिळताच झोन 12 चे डीसीपी डॉक्टर डीएस स्वामी यांनी संपूर्ण भागातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. या दरम्यान, आरे पोलिसांना सादिकचे अपहरण होत असतानाचा व्हिडिओ मिळाला. त्या आधारावर मालवणी पोलिसांकडून माहिती मिळाली की, त्यामध्ये सहभागी महिलेचे नाव यास्मीन आहे, सोबतच तिचा मोबाइल नंबर सुद्धा आरे पोलिसांना मिळाला. या मोबाइल नंबरद्वारे लोकेशन ट्रेस करून पोलीस अ‍ॅम्ब्युलन्सचा पाठलाग करत होते. दहिसर चेक नाक्यावर पकडले गेल्यानंतर आरोपींनी पोलिसांना सांगितले सादिकचे अपहरण करून ते कांदिवली पश्चिम, एस. व्ही. रोडच्या शताब्दी हॉस्पिटलजवळ पोहचले तेव्हाच डिझल संपले.

ज्यानंतर या लोकांनी इनोव्हा मागवली त्यामध्ये सादिकला बसवून सर्वजण नायगावकडे निघाले होते. तिथे जंगलात घेऊन जाऊन यास्मीन आपल्या साथीदारांसोबत सादिकची हत्या करून आपल्या भावाच्या खूनाचा बदला घेणार होती. पोलिसांनी या प्रकरणी अपहरण आणि हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. सर्व आरोपींकडे चॉपर, तलवारसह इतर धारधार हत्यारे सापडली आहेत. सोबतच एक अ‍ॅम्ब्युलन्स आणि इनोव्हा कार सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे.