Murder News | चाकूने सपासप वार करत भरबाजारातच पतीने पत्नीचा केला खून, जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन (policenama online) – बाजारहट करण्यासाठी आलेल्या पत्नीचा भरबाजारातच (market) पतीने चाकूने (knife) सपासप वार करून खून (Murder News) केला. तसेच अन्य एकजण चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. पाळधी ( ता.धरणगाव, जि. जळगाव) येथे बुधवारी (दि. 23) दुपारी 2 च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पतीवर धरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. या घटनेमुळे पाळधीत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, खुनाचे कारण समजले नसले तरी पती-पत्नीत वाद होता. पती सतत संशय घेत होता, त्यामुळे पत्नी नांदायला जात नसल्याचे समोर आले आहे. Murder News | husband stabbed his wife market jalgoan market closed

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

पूजा सुनील पवार (वय 26) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर शंकर भिका चव्हाण (वय 18) असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सुनील भिका पवार (वय 34 रा. शिवाजी नगर, जळगाव) याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यापासून पूजा माहेरी पाळधी येथे होती. मंगळवारी देखील पाळधीत पती-पत्नीत वाद झाले होते. त्याची पाळधी पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती. हा खून करण्यासाठी सुनीलने बाजारातून चाकू खरेदी केला होता. पत्नी सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानातून वस्तू घेतल्यानंतर लगेच त्याने तिच्यावर चाकूने सपासप वार करून खून केला.

Web Title :- Murder News | husband stabbed his wife market jalgoan market closed

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

महाराष्ट्र मेट्रोच्या नागपूर ब्रांचमध्ये विविध जागांसाठी पदभरती, जाणून घ्या

विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीची 9,371 कोटींची संपत्ती बँकांना झाली ट्रान्सफर