Kolhapur News : अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता तिचा पती, प्रियकरानं संपवलं अन् पत्र्याच्या पेटीतून मृतदेह दिला फेकून

हातकणंगले (कोल्हापूर) : पोलीसनामा ऑनलाइन – शनिवारी हुपरी येथे अनैतिक संबंधातून रखेलीच्या पतीचा प्रियकराने काटा काढल्याची उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता म्हणून प्रियकराने आपल्या साथीदारांच्या मदतीने केबलने गळा आवळून रखेलीच्या पतीचा खून करून तो मृतदेह पत्र्याच्या पेटीत घालून फेकून देण्यात आला. महंमद बंडू जमादार असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मृतदेह असलेली पेटी कोगनोळी-हंचनाळ रस्त्यावरील ओढ्यात आढळली आहे. एका बेपत्ता व्यक्तीचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने हुपरी पोलिसांकडून हा खून उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणी महमद यांची पत्नी तहसिम, सूरज महमंदहानिफ शेख व सौरभ पांडुरंग पाटील यांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले. मुख्य संशयित सचिन गजानन मगदूम फरार झाला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण
तळंदगे फाटा, पट्टणकोडोली येथे महंमद बंडू जमादार यांचा स्क्रॅपचा व्यवसाय होता. २६ फेब्रुवारीपासून ते बेपत्ता झाले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने याप्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन हुपरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपण केलेल्या गुन्हयाची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी म्हणजेच कोगनोळी येथील ओढ्याजवळ जाऊन खात्री केली केली आणि तो मृतदेह ताब्यात घेतला. महंमद जमादार हा पट्टणकोडोली येथील तळंदगे फाटा वसाहतीत आपल्या पत्नी व मुलांसह राहत होता. महंमद जमादार यांची पत्नी तहसिम जमादार व हुपरी येथील सचिन मगदूम यांचे एकमेकांबरोबर अनैतिक संबंध होते. पती महंमद यांच्यामुळे या संबंधात अडथळा निर्माण होत होता. त्यानंतर पत्नी तहसिम जमादार हिने प्रियकर सचिन व त्याचे साथीदार सूरज शेख आणि सौरभ पाटील यांच्या मदतीने महंमदचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले.

कशाप्रकारे खून करण्यात आला
सचिन व त्याच्या साथीदारांनी महंमद यास कर्ज मिळवून देण्याचा बहाण्याने कारमधून कागलजवळ नेले. त्या ठिकाणी त्यांनी क्लच केबलच्या साह्याने महंमद यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्यांनी तो मृतदेह पेटीत घालून कर्नाटक हद्दीत फेकला अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्याकडून देण्यात आली आहे.