Murud Janjira | मुरूडचा जंजिरा बघायचा प्लॅन करत असाल तर, प्रशासनाचा हा निर्णय माहितीये का ?

जंजिरा : पोलीसनामा ऑनलाइन – कोकणामधील (Konkan) रायगड जिल्ह्यात (Raigad) असणारा जलदुर्ग म्हणजे मुरूडचा जंजिरा (Murud Janjira). हा जंजिरा महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण किल्ल्यांपैकी एक आहे. अनेक पर्यटकांचे आकर्षण असलेल्या जंजिऱ्यावर कायम मोठी गर्दी असते. मात्र सोमवार ३० मे पासून पुढे तीन महिने तो बंद ठेवला जाणार आहे. पावसाळ्याच्या (Monsoon) पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेतली जात असून तीन महिने जंजिरा जलदुर्ग पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. (Murud Janjira)

आगामी पावसाळ्याचे दिवस व समुद्राच्या लाटांचा बदललेला वेग यामुळे या किल्ल्यावर पोहोचणे धोक्याचे ठरू शकते. हा धोका पर्यटकांसोबतच व्यावसायिक, जहाज व्यवसायिक व गाईड करणाऱ्यांच्या जीवाला देखील असल्याने किल्ला पूर्णपणे बंद केला आहे. दर वर्षी हा किल्ला पावसाळ्यात पाहण्यासाठी बंद ठेवला जातो. या वर्षीदेखील किल्ला सोमवारी ३० मे पासून बंद राहणार असून तीन महिन्यानंतर पुन्हा सप्टेंबर (September) महिन्यात जलदुर्ग (Jaldurg) पाहण्यासाठी पर्यटकांना खुला होईल. रायगड जिल्हा प्रशासनाकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

या २६ मे पासूनच हा किल्ला बंद ठेवला जाणार होता पण, शनिवार-रविवार (Weekend) सुट्टी आल्यामुळे पर्यटकांची (Tourists) मोठी गर्दी झाली होती. मात्र या सर्वांना बाहेरूनच या किल्ल्याचे दर्शन घेऊन अनेकांना परत फिरावे लागले. जलदुर्ग असलेल्या जंजिरा किल्ल्याच्या दारापर्यंत फक्त शिडाच्या होड्या (Boats) जातात. पावसामुळे समुद्राचा (Sea) प्रवाह वाढतो. समुद्राच्या पाण्याचा बदललेला प्रचंड वेगामुळे शिडाच्या बोटी हेलकावे घेतात व अशारितीने किल्ल्यावर जाणे धोकादायक होते. नागरिकांच्या सुरक्षिततेमुळेच प्रशासनाकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

या किल्ल्यावर जाण्यासाठी कायमस्वरूपीचा रस्ता (Roads) किंवा पुलाची (Bridge) सोय व्हावी असा
प्रस्तावही मेरीटाईम बोर्डाकडून (Maritime Board) देण्यात आला होता.
मात्र पुरातत्व खात्याने (Department of Archaeology) जलदुर्गाचे महत्व कमी होईल म्हणून प्रस्ताव नाकारला.
ही ऐतिहासिक वास्तू असल्याने हजारोंच्या संख्येने लोक येत असतात.
मात्र पुढील तीन महिने पर्यटकांना किल्ला बघता येणार नाही. (Murud Janjira)

Web Title :  Murud Janjira | If you are planning to see the chain of Murud, do you know this decision of the administration?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shubman Gill | शुभमन गील आणि सचिन तेंडूलकरचा हितगुज करताना फोटो व्हायरल; नेटिझन्सनच्या भन्नाट कमेंट्स

NCP Chief Sharad Pawar | ‘नव्या संसद भवनाची इमारत बांधताना…’ शरद पवारांचा गंभीर आरोप

Sambhajiraje Chhatrapati | स्वराज्य संघटना राज्यातील सर्व निवडणुका लढवणार, संभाजीराजेंची मोठी घोषणा (व्हिडिओ)