धर्म लपवुन ‘त्याने’ UPच्या मंदिरात केलं ‘लग्‍न’ ; रांचीत केला ‘निकाह’ अन् 5 वर्षानंतर दिला ‘तलाक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – धर्म लपवून चरही थाना क्षेत्रातील राहिवासी रमजान अंसारी याने उत्तर प्रदेशमधील आजमगढ येथील एक तरुणीला फसवून तिच्याशी मंदिरात लग्न केले. त्यानंतर रांचीला नेऊन जबरदस्ती तिच्याशी निकाह केला आणि तरुणीचे नाव शबनम ठेवण्यात आले.

5 वर्षांनी त्या तरुणीला त्यांने तलाक देखील दिला. याविरोधात पीडित तरुणीने चरही पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी रमजान अंसारी याला अटक केली, चौकशीमध्ये आपण तिला फसवल्याचे त्याने कबूल केले. रमजान ट्रक ड्रायवर आहे. त्या तरुणीला 5 वर्षांची एक मुलगी आणि 8 महिन्याचा एक मुलगा आहे. तरुणीने सांगितले की ती एका लॉजवर राहते आणि जवळच्याच एका फॅक्टरीत काम करते. ती एकटी राहत असल्याने लोक तिला त्रास देतात.

हिंदू असल्याचे भासवून केले लग्न –

पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले की, ती उत्तर प्रदेशात आजमगढ येथे राहायची. 5 वर्षापूर्वी रमजान यांने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यावेळी रमजानने त्याचे नाव अखिलेश यादव असल्याचे तिला सांगितले. तो झारखंडच्या हजारीबाग येथील रहिवाशी आहे. आपले लग्न झाले नसल्याचे देखील त्याने तिला सांगितले. त्या तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेऊन 5 वर्षांपूर्वी तिच्या घरच्यांना विरोध करुन त्याच्या बरोबर मंदिरात जाऊन लग्न केले आणि त्याच्या सोबत झारखंडला गेल्यावर काही दिवसांनी तिच्या लक्षात आले की तिची फसवणूक झाली आहे. तरुणाने धर्म लपवून तिच्याशी लग्न केले होते. त्याचे खरे नाव रमजान अंसारी आहे.

बस अडवून पुन्हा मारहाण –
रमजानने तिला झारखंडमध्ये एका लॉजवर ठेवले होते. रमजानला उद्योगधंद्यासाठी तिने 60 हजार रुपये दिले होते. ते पैसे तरुणीने महिला मंडाळाकडून घेतले होते, प्रत्येक महिन्याला त्या पैशावर तिला व्याज द्यावे लागते. तेच पैसे मागणासाठी ती पिपरा येथे आली होती. त्यावेळी रमजानकडून तिला मारहाण करण्यात आली. तिला पुन्हा रांचीला जाण्यासाठी पैसे देखील दिले नाही. त्यानंतर चरही पोलिसांची मदत घेऊन रांची जाण्यासाठी ती ज्या बसमध्ये बसली होती, त्या बसला कारने अडवून त्या तरुणीला काही जणांकडून पुन्हा  गंभीर मारहाण करण्यात आली.

तरुणीने झालेल्या मारहाणीनंतर पुन्हा एकदा पोलीस स्टेशन गाठले, त्यानंतर तक्रार दाखल करुन पोलीसांनी रमजानला ताब्यात घेतले, चौकशीत त्याने मारहाण केल्याची आणि फसवणूकीची कबुली दिली पोलीस, बस अडवून मारहाण करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.

सिने जगत –

‘लस्ट स्टोरीज’मधील ‘व्हायब्रेटर सीन’बाबत कियारा आडवाणीचा मोठा ‘खुलासा’

अभिनेता हृतिक रोशन पेक्षाही त्याची ६४ वर्षाची आई फिटनेस ‘सजग’ ; पहा फोटो, व्हिडिओ

‘फेमिना मिस इंडिया’चा ‘ताज’ राज्यस्थानच्या सुमन रावच्या डोक्यावर

‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये एका नवीन स्पर्धकाची ‘एन्ट्री’