Mutual Fund Calculator | ‘या’ म्युच्युअल फंडने गुंतवणुकदारांचे पैसे एक वर्षात केले ‘दुप्पट’; जाणून घ्या

नवी दिल्ली : Mutual Fund Calculator | मागील एक वर्षात बहुतांश म्युच्युअलफंडने बाजाराच्या वेगावर स्वार होत शानदार रिटर्न दिला आहे. स्मॉल कॅप इक्विटी म्युच्युअल फंड श्रेणीतून रिटर्न सर्वात चांगला होता. काही स्मॉल कॅप इक्विटी फंडने 100 टक्केपेक्षा जास्तचा रिटर्न दिला आहे. यासाठी, जर तुम्ही मागील वर्षी यावेळी या फंडांमध्ये पैसे लावले असते तर तुमचे पैसे दुप्पट झाले असते. ते कोणते स्मॉल कॅप इक्विटी फंड आहे की, ज्यांनी 100 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त रिटर्न (Mutual Fund Calculator) दिला आहे.

निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप (Nippon India Small Cap)

8 ऑक्टोबर 2020 ला या फंडची नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू 44.63 रुपये होती, तर 7 ऑक्टोबर 2021 ला ही अ‍ॅसेट व्हॅल्यू 90.59 रुपयांवर आली होती. तर, मागील वर्षी 8 ऑक्टोबरला करण्यात आलेली 1 लाखाची गुंतवणूक दुप्पट होऊन 2.01 लाख झाली असती. मागील वर्षात फंडने 101.15 टक्के रिटर्न दिला आहे. या दरम्यान, जर एखाद्या गुंतवणुकदाराने 10,000 रुपयाची एसआयपी केली असती तर ती वाढून 1.69 लाख रुपये झाली (Mutual Fund Calculator) असती.

कोटक स्मॉल कॅप (Kotak Small Cap)

स्मॉल कॅप कॅटेगरीत या फंडने मागील एक वर्षात 107.04 टक्केपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. 8 ऑक्टोबर 2020 ला फंडचा एनएव्ही 88.27 होता जो 7 ऑक्टोबर 2021 ला 181.25 रुपये झाला. यासाठी मागील एक वर्षात 1 लाखाची गुंतवणूक वाढून 2.07 लाख रुपये झाली आहे. जर कुणी या दरम्यान 10 हजार रुपये प्रति महिनाच्या एसआयपी केली असेल तर तो 1.68 लाख रुपयांचा फंड तयार करेल.

क्वांट स्मॉल कॅप (Quant Small Cap)

या फंडने मागील एक वर्षात या कॅटेगरीत सर्वात जास्त रिटर्न दिला आहे. मागील वर्षी 8 ऑक्टोबरला फंडचा एनएव्ही 62.37 रुपये होता, जो 7 ऑक्टोबर 2021 ला 135.97 रुपये झाला. याचा अर्थ आहे की, केवळ एका वर्षात या फंडमध्ये थेट 119.65 टक्केची तेजी दिसून आली. जर एखाद्या गुंतवणुकदाराने प्रति महिना 10,000 रुपयांची एसआयपी केली असती तर त्याची व्हॅल्यू आज एक वर्षानंतर 2.20 लाख रुपये झाली असती. (Mutual Fund Calculator)

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

हे देखील वाचा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 153 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Mutual Fund Calculator | mutual fund calculator these mutual funds double their money in one year

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update