Mutual Fund SIP Investment | 10 वर्षात बनवायचा असेल 50 लाखांचा फंड, दर महिना किती करावी लागेल SIP; पहा कॅलक्युलेशन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Mutual Fund SIP Investment | म्युच्युअल फंड एसआयपी हा असाच एक गुंतवणुकीचा पर्याय आहे, ज्याद्वारे तुम्ही नियमित छोट्या बचतीतूनही इक्विटी सारखा रिटर्न मिळवू शकता. तुमच्या मासिक बचतीला दर महिना गुंतवणूक करण्याची सवय लावा, तर तुम्ही भविष्यात लाखो रुपयांचा निधी सहज तयार करू शकता. Systematic Investment Plan (SIP) द्वारे गुंतवणूक करणे खूप सोपे आहे. यामध्ये गुंतवणूकदार दरमहा 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतो. (Mutual Fund SIP Investment)

 

दीर्घ कालावधीसाठी SIP मधून चक्रवाढीचा प्रचंड फायदा होतो. यामध्ये तुम्ही तुमच्या टार्गेट फंडानुसार दर महिन्याला गुंतवणुकीच्या रकमेचा अंदाज लावू शकता. दीर्घ मुदतीत गुंतवणूकदारांना एसआयपी मध्ये सरासरी 12 टक्के किंवा त्याहून अधिक रिटर्न मिळाला आहे.

 

10 वर्षात 50 लाख निधी कसा बनवायचा

तुम्हाला 10 वर्षात 50 लाखांचा फंड बनवायचा असेल, तर सर्वप्रथम हे पहावे लागेल की, पोर्टफोलिओमध्ये जो फंड समाविष्ट करणार आहात त्याचा दिर्घ कालावधीसाठी सरासरी वार्षिक रिटर्न किती आहे.

जर 10 वर्षांच्या SIP रिटर्न्सवर नजर टाकली तर अशा अनेक योजना आहेत, ज्यांचा सरासरी रिटर्न 14 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

SIP कॅल्क्युलेटर नुसार, वार्षिक सरासरी 12 टक्के रिटर्न अपेक्षित असल्यास, 10 वर्षात 50 लाखांचा फंड तयार करण्यासाठी, तुम्हाला प्रति महिना 22,000 रुपये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. 10 वर्षांत तुमचा निधी 51.1 लाख रुपये असू शकतो. (Mutual Fund SIP Investment)

ज्यामध्ये तुमची गुंतवणूक 26.4 लाख रुपये आणि वेल्थ गेन 24.7 लाख रुपये असा अंदाज आहे. हे लक्षात ठेवा की जर सरासरी रिटर्न कमी किंवा जास्त असेल, तर तुमचा अंदाजे फंड वर किंवा खाली जाऊ शकतो.

 

22% पर्यंत रिटर्न
म्युच्युअल फंडांच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांचा एसआयपी रिटर्न गेल्या 10 वर्षात सरासरी 14 टक्के आहे.
मोतीलाल ओसवाल NASDAQ 100 ETF फंडाचा सर्वाधिक वार्षिक रिटर्न 22.61 टक्के आहे.

या व्यतिरिक्त, Nippon Ind ETF Junior BeES (13.61%), Quantum Eqt FoF (13.02%), ICICI Pru सेन्सेक्स (12.9%) चा रिटर्न देखील सरासरी 12% पेक्षा जास्त आहे.
(या फंडची रिटर्न व्हॅल्यू रिसर्चमधून घेण्यात आली आहे. रिटर्न 8 मार्च 2022 रोजीच्या एनएव्हीवर आधारित आहे.)

SIP गुंतवणुकीचा सोपा मार्ग
एसआयपी ही गुंतवणुकीची सोपी पद्धत आहे. एसआयपीमध्ये गुंतवणूकदाराला बाजारातील जोखमीचा थेट सामना करावा लागत नाही.
त्याचवेळी, रिटर्न देखील ट्रेडिशनल प्रॉडक्टपेक्षा जास्त आहे.

मात्र, यातही जोखीम आहे.
त्यामुळे गुंतवणूकदाराने त्याचे उत्पन्न, लक्ष्य आणि जोखीम प्रोफाईल पाहून गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.
याद्वारे तुम्ही गुंतवणुकीची सवय, जोखीम आणि त्यावरील रिटर्न यांचे आकलन सहज समजून घेऊ शकता.

 

Web Title :- Mutual Fund SIP Investment | mutual fund sip calculation how much monthly sip required to make 50 lakh rupees fund in 10 years here calculation

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा