Mutual Fund SIP | 167 रुपये रोज वाचवून मिळवा 11.33 कोटी रुपये! येथे जाणून घ्या कॅलक्युलेशन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Mutual Fund SIP | नोकरीनंतर निवृत्तीनंतरच्या खर्चाची चिंता जवळपास सर्वांनाच असते. पण जबाबदार्‍यांमध्ये मोठी गुंतवणूक करणे अवघड असते. अशावेळी जर तुम्हालाही छोट्या गुंतवणुकीत मोठा नफा मिळवायचा असेल तर ही बातमी नक्की वाचा. आज आम्ही गुंतवणुकीच्या काही मूलभूत तत्त्वांबद्दल सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही कमी वेळेत छोट्या गुंतवणुकीने मोठा फंड बनवू शकता. (Mutual Fund SIP)

 

लहान वयापासूनच करा गुंतवणूक
गुंतवणुकीसाठी योग्य वेळ निवडणे खूप महत्त्वाचे आहे. गुंतवणूक सल्लागार नेहमी लहानपणापासूनच गुंतवणूक सुरू करण्याची शिफारस करतात, कारण यात तुम्हाला गुंतवणुकीच दीर्घ कालावधी आणि जास्त जोखीम घेण्याची क्षमता मिळते. एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून, तुम्ही दीर्घ मुदतीत करोडो रुपये कमवू शकता. (Mutual Fund SIP)

 

म्युच्युअल फंडातील एसआयपीने बना करोडपती
जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी एसआयपीद्वारे गुंतवणूक करायला सुरुवात केली असेल. जर तुम्ही दर महिन्याला 5000 रुपये वाचवले, म्हणजे दिवसाला 167 रुपये आणि एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली, तर निवृत्तीच्या वयाच्या 60 व्या वर्षी तुमच्याकडे 11.33 कोटी इतकी मोठी रक्कम असेल.

मासिक गुंतवणूक – रु 5000

अंदाजे रिटर्न – 14%

वार्षिक एसआयपी – 10% वाढ

एकूण गुंतवणूक कालावधी – 35 वर्षे

एकूण गुंतवणूक – रु. 1.62 कोटी

एकूण रिटर्न – रु. 9.70 कोटी

मॅच्युरिटी रक्कम – रु. 11.33 कोटी

 

या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

दरवर्षी जेव्हा तुमचा पगार वाढतो तेव्हा गुंतवणुकीची रक्कमही वाढवा.

35 वर्षांच्या दीर्घ कालावधीत कंपाऊंडिंगचे मोठे फायदे मिळतात.

म्युच्युअल फंड तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी 10-16 टक्के वार्षिक रिटर्न देतात.

जेव्हा दरवर्षी गुंतवणूक वाढवता, तेव्हा तुम्ही निवृत्तीपूर्वीच लक्षाधीश होता.

 

Web Title :-  Mutual Fund SIP | mutual fund sip investment save167 per day and get 11 33 crore on retirement know the trick

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC IPO | एलआयसीचे काय होणार? 841 रूपये झाला शेअरचा भाव; जाणून घ्या शेअर मार्केटमधील हलचाल

 

Dolly Khanna Stock | दोन वर्षात डॉली खन्ना यांच्या शेअरने दिला 600% रिटर्न, अजूनही आहे का गुंतवणुकीची संधी?

 

Anti Corruption Bureau (ACB) Thane | भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर अँटी करप्शनकडून गुन्हा दाखल