भाजप खासदार म्हणाले, बिहारमधील १३४ बालकांचा मृत्यू ‘4G’ मुळे

मुजफ्फरपूर : वृत्तसंस्था – मुजफ्फरपुरचे भाजप खासदार यांनी बिहारमधील १३४ मुलांच्या मृत्यूला ४ जी जबाबदार असल्याचे बेताल वक्तव्य केले आहे. राज्यातील १३४ मुलांच्या अक्यूट एन्सीफिलायटीसमुळे झालेल्या मृत्यूला त्यांनी ४जी ला जबाबदार ठरवत या ४जी साठी करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले निषाद ?
निषाद म्हणाले की, एनसिफीलायटीसमुळे होणाऱ्या मृत्यूला गाव, गरिबी, गंदगी आणि गर्मी हे ४जी जबाबादार आहेत. असं विधान त्यांनी केले आहे. तर यासाठी अतिमागासलेपाणाही जबाबदार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे मोठं वादंग निर्माण झाले आहे.

नितीश कुमार यांनी मुझफ्फरपूरचा दौरा केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. परंतु मृत्यूमुखी पडणाऱ्या बालकांची संख्या कशी कमी करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. त्यासोबतच चमकीला जबाबदार ठरविण्यात आलेल्या या चार गोष्टींवर काम सरकारने करणे गरजेचे आहे. कारण जी मुले दगावली आहेत किंवा उपचार घेत आहेत. त्या मुलांची परिस्थीती अत्यंत हलाखीची आहे. त्यांचे जीवनमान उंचावण्याची आवश्यकता आहे. असे निषाद म्हणाले तर संयुक्त जनता दलाचे खासदार म्हणाले की, भयकंर उष्णता बालकांच्या मृत्यूला जबाबदार आहे. उन्हाळ्यात बालकांच्या मृत्यूची संख्या वाढत आहे. पावसाळा सुरु झाला की ते प्रमाण कमी होते असे यादव म्हणाले आहेत.

आरोग्य विषयक वृत्त-
#YogyaDay 2019 : ‘सौंदर्य’ आणि ‘तारुण्य’ वाढविणारे नटराजन आसन
“ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय
” टाच ” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय