अंत्यसंस्कारानंतर कुटूंबिय ‘श्राध्द’ घालण्याच्या तयारीत, ‘तो’ मयत युवक घरी पोहचल्याने ‘खळबळ’

मुझफ्फरपूर : वृत्तसंस्था – बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत युवकाचे अंत्यसंस्कार केल्यानंतर काही दिवसांनी अचानकपणे तोच युवक घरी परतला. प्रथम त्या तरुणाला पाहून घरातील माणसे घाबरली. मात्र नंतर जेव्हा त्या तरूणाने संपूर्ण गोष्ट सांगितली तेव्हा कुटुंबातील सदस्यांचा आनंदाला पारावराचं उरला नाही. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी व नंतरवाईकांनी या तरुणाला पाहण्यासाठी गर्दी केली. या युवकाचे अंतिम संस्कार केल्यांनतर घरचे लोक श्राद्धाची तयारी करत होते या दरम्यान तो घरी परतला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मुशहरी पोलिस स्टेशन परिसरातील बुधनगरा गावची आहे. बुधनगरा येथील सेवानिवृत्त सैनिक रामसेवक ठाकूर यांचा मुलगा संजीव कुमार 25 ऑगस्ट रोजी अचानक बेपत्ता झाला होता. बराच शोध घेतल्यानंतरही तो सापडला नाही. त्यामुळे 30 ऑगस्ट रोजी कुटूंबाने त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार मुशहरी पोलिस ठाण्यात दिली.

दरम्यान, मीनापुर येथे पाण्यात पडलेला मृतदेह आढळला. मीडियामध्ये प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्याच्या नातेवाईकांनी एसकेएमसीएचमध्ये जाऊन मृतदेहाची ओळख पटवून घेतली. त्यानंतर त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

दरम्यान बुधवारी संजीव अचानक गावात पोहोचला. संजीवला पाहिल्यावर पालक आणि कुटुंबीय खूप खूश झाले आणि त्यांनी इतर नातेवाईकांना माहिती दिली. संजीवच्या वडिलांनी सांगितले की, रुग्णालयात मृतदेह संजीव सारखाच होता त्यामुळे त्यांची ओळख चुकली. मुशहरी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की संजीवचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like