खळबळजनक ! माझा पती ‘होमो’, मला ‘सेक्स रॅकेट’मध्ये ढकललं, पत्नीचे ‘डॉक्टर’ पतीवर ‘गंभीर’ आरोप

चुनाभट्टी (मध्यप्रदेश) : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ शहरातील चुनाभट्टी येथील एका महिलेने आपल्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. पती समलैंगिक असून तो आपल्याला बजळजबरीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचा गंभीर आरोप डॉक्टर पत्नीने पतीवर केला आहे. याप्रकरणी महिलेने माधवगढ पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. अभिनीत गुप्ता असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे.

पत्नीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, पती पॉयजन एंटी एजिंग स्किन क्लीनिक चालवतो. या क्लिनीकच्या आडून तो पब, वेश्या व्यवसाय आणि जिम तसेच नकली औषध विक्रीचा व्यवसाय करत आहे. तो आपल्या इच्छेविरुद्ध वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे तक्रीरीत म्हटले आहे. तसेच पतीने माहेराहून २५ लाख रुपये घेऊन येण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता याचे याच वर्षी लग्न झाले आहे. पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून गुप्तावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पत्नीने आपल्या विरुद्ध तक्रार दिल्याचे समजताच गुप्ताने प्रसारमाध्यमांशी संपर्क साधून पत्नी आणि तिचे कुटुंबीय हे त्याला सातत्याने पैशांची मागणी करून ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केला आहे. या त्रासाला कंटाळून लग्न झाल्यानंतर मार्च महिन्यात विवाहित झाल्यावर अवघ्या एका महिन्यातच म्हणजे एप्रिलमध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला असल्याची माहिती दिली.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like