‘My Jio’ मध्ये मिळणार ‘UPI’ पेमेंट सपोर्ट, ‘गुगल पे’ अन् ‘फोन पे’ शी तगडी स्पर्धा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स जिओकडून जियो मार्ट लॉन्च करण्यात आल्यानंतर आता यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) देखील जिओ अ‍ॅपमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. माय जिओ अ‍ॅपमध्ये यूपीआय पेमेंटचा सपोर्ट देण्यात आला आहे. काही यूजर्सला या फीचरचे अपडेट मिळाले आहेत.

एका वृत्तानुसार माय जिओ अ‍ॅपमध्ये वर्चुअल पेमेंट अ‍ॅड्रेसचा आणि यूपीआय आयडी जोडण्याचा पर्याय मिळत आहे. यापूर्वी माहिती होती की रिलायन्स जिओ यासाठी अ‍ॅक्सिस, आयसीआयसीआय आणि एसबीआयशी चर्चा करत आहे. परंतु जिओने यूपीआय पेमेंटमध्ये उतरल्यास गुगल पे, फोन पे साठी ही मोठी स्पर्धा असणार आहे.

ट्विटरवर एका यूजरने माय जिओ अ‍ॅपच्या यूपीआय पेमेंट फीटरचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यात अ‍ॅपद्वारे यूपीआय आयडीची मागणी करत आहे. यानंतर यूजर्सला यात आपला मोबाइल नंबर, डेबिट कार्ड नंबर आणि बँकेचे अकाऊंट डिटेल्स द्यावे लागतात. जिओ अ‍ॅप ओपन केल्यानंतर इतर यूपीआय सारखेच हे यूपीआय असल्याचे दिसते. असे असले तरी याची अधिकृत माहिती समोर आली नाही.

कंपनीकडून सांगण्यात आले होती की 2019-20 च्या तिसऱ्या तिमाहीत कंसोलिडेटेड लाभ 11,640 कोटी रुपये झाला आहे जो मागील वर्षापेक्षा 13.5 टक्के जास्त आहे. त्यामुळे जिओला तिसऱ्या तिमाहीत बंपर फायदा झाला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिडेट कडून सांगण्यात आले की 31 डिसेंबर पर्यंत जिओचे ग्राहक 37 कोटींवर गेले आहेत. 12 महिन्या जिओने 13 कोटी 57 लाख नवे ग्राहक जोडले. तर 1 कोटी 48 लाख ग्राहक मागील तिमाहीत जोडले गेले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like