UPI आणि RuPay ट्रांजेक्शनवर 1 जानेवारी नंतर वसूल केलेला ‘टॅक्स’ होणार रिफंड, आयकर विभागाचा बँकांना आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयकर विभागाने रविवारी बँकांना रूपे कार्ड किंवा भीम-यूपीआय सारख्या डिजिटल माध्यमातून केलेल्या व्यवहारात 1 जानेवारी 2020 नंतर वसूल केलेला टॅक्स ग्राहकांना रिफंड करण्याचा आदेश दिला आहे. बोर्डाने आयकर अधिनियमांच्या कलम 269 SQ अतंर्गत इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर कोणतेही शुल्क आकारण्याबद्दल काढलेल्या परिपत्रकात बँकांना सल्ला दिला की, त्यांनी या माध्यमात केल्या जाणाऱ्या कोणत्याही व्यवहारात अतिरिक्त शुल्क आकारू नये.

सरकारने डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कमी नगदी अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत वित्त अधिनियमांत 2019 मध्ये कलम 269 SQ जोडले. या अधिनियमानुसार मागील वर्षी 50 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा व्यवहार करणाऱ्या व्यक्ती त्यांना उपयुक्त असणारे इलेक्ट्रॉनिक माध्यम सुनिश्चित करू शकतात. नंतर सरकारने डिसेंबर 2019 मध्ये रूपे डेबिट कार्ड, भीम यूपीआय, क्युआर कोड निर्धारित करून इलेक्ट्रॉनिक माध्यम काढले.

सीबीडीटीने काढलेल्या परिपत्रकात बँकांना सांगितले आहे की जर 1 जानेवारी नंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करून कोणी व्यवहार केला आणि त्यावर टॅक्स घेतला असेल तर तो परत करण्यात यावा. भविष्यात अशा प्रकारचे कोणतेही शुल्क आकारू नये.

सीबीडीटीने सांगितले की डिसेंबर 2019 मध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं की 1 जानेवारी 2020 पासून इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करून कोणी व्यवहार केला तर त्यावर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. काही बँका अजूनही अतिरिक्त शुल्क आकारत आहेत. अशा प्रकारे शुल्क आकारणे आयकर अधिनियमाच्या कलम 269 SQ चे उल्लंघन आहे. अशा उल्लंघनावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.