रॉयटर्सच्या ‘त्या’ २ पत्रकारांची अखेर सुटका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दीड वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात घालवल्यानंतर अखेर राऊटर्सच्या दोन पत्रकारांची सुटका करण्यात आली आहे. म्यानमारच्या विशेष गुप्तता कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती.

वा लोन आणि क्याओ सुई ओ या दोघांना सप्टेंबर महिन्यात ७ वर्षांची शिक्षा देण्यात आली होती. मी पत्रकार असून कधी एकदा पुन्हा माझ्या न्यूजरूम जातोय असे झाले आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी वा लोन याने व्यक्त केली. डिसेंबर २०१७ मध्ये रोहिंग्याविषयी माहिती गोळा करत असताना त्यांना कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी शिक्षा झाली होती.

दरम्यान, म्यानमार मधील पारंपरिक नववर्षी काही कैद्यांना मुक्त केले जाते. यावर्षी देखील १७ एप्रिल रोजी म्यानमारने ६२५० कैद्यांची सुटका केली. याच कैद्यांमध्ये या दोघांचा देखील समावेश होता.