रूममेटकडून प्रसिध्द अभिनेत्रीचा काचेच्या ग्लासनं केला चेहरा ‘विद्रुप’, बेदम मारहाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अभिनेत्री नलिनी नेगी हिच्यावर रुममेटने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रुममेटने केलेल्या हल्ल्यामुळे तिच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत तिनं ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एका मुलाखतीत नलिनीने घडलेल्या या प्रकारची माहिती दिली आहे.
https://www.instagram.com/nalininegi/?utm_source=ig_embed
नलिनी नेगी हिने दिलेल्या माहितीनुसार, नलिनी आणि प्रीती राणा काही वर्षांपासून एकमेकांच्या रुममेट आहेत. मात्र काही महिन्यांपूर्वी नलिनी ओशिवारामध्ये 2BHK फ्लॅटमध्ये आई-वडीलांसोबत राहायला गेली. तिचे आई-वडील काही दिवस दिल्लीला तिच्या बहिणीकडे राहायला गेले होते. त्याचवेळी प्रीतीनं नलिनीला ओशिवारामधील तिच्या घरी काही दिवस ठेऊन घेण्याची विनंती केली. नलिनीने तिला काही दिवस सोबत राहण्याची परवानगी दिली. प्रीती नलीनीच्या फ्लॅटवर राहायला आल्यानंतर काही दिवसांनी तिची आईसुद्धा राहायला आली.

मागच्या आठवड्यात प्रीतीच्या आईने नलिनीशी अचानक वाद घालायला सुरुवात केली. नलीनीने शांत करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मुलगी प्रीतीला फोन करून तक्रार केली. प्रीती घरी आल्यानंतर प्रीती राणा आणि तिची आई यांनी मिळून नलिनीला खूप मारहाण केली. हल्ला करताना त्यांनी ग्लासचा वापर केला. ज्यामुळे नलिनीच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. सुदैवाने मी वाचले नाहीतर त्यांनी माझा चेहरा खराब करण्याचा आणि मला मारण्याचा पूर्ण प्लान केला होता. अशी माहिती नलिनीने दिली आहे.


आरोग्यविषयक वृत्त –