NABARD | नाबार्डचे कर्ज आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 25.2 टक्के वाढून 6 लाख कोटी रुपयांवर पोहचले

नवी दिल्ली : NABARD | राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (NABARD) रविवारी आपला वार्षिक अहवाल (annual report) जारी केला. अहवालात सांगितले की, 2020-21 आर्थिक वर्षादरम्यान बँकेचे कर्ज आणि अ‍ॅडव्हान्स (loans and advances) मागच्या वर्षीच्या तुलनेत 25.2 टक्के वाढून 6 लाख कोटी रुपयां (Rs 6 lakh crore) वर पोहचले.

अहवालात सांगितले गेले की, नाबार्ड (NABARD) ने आर्थिक वर्ष 2020-21 च्या दरम्यान 34,671.2 कोटी रुपयांचे उत्पन्न (revenue of Rs 34,671.2 crore) कमावले, जे मागील वर्षाच्या तुलनेत 6.1 टक्के जास्त (6.1 per cent higher) आहे. करातून पहिल्या आर्थिक चालू वर्षात लाभ 6,081.4 कोटी रुपये राहिला, तर यापूर्वी मागील आर्थिक वर्षात तो 5,234.3 कोटी रुपये होता.

Malicious Apps | सावधान ! तात्काळ आपल्या फोनमधून DELETE करा ‘हे’ 8 अ‍ॅप, Google ने केले बॅन; जाणून घ्या लिस्ट

2019-20 मध्ये लाभ 3,859.2 कोटी रुपये होता

मागील वर्षात बँकेचा लाभ 4,320 कोटी रुपयांवर पोहचला. यापूर्वी म्हणजे आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये लाभ 3,859.2 कोटी रुपये होता. नाबार्ड (National Bank for Agriculture and Rural Development) ने सांगितले की, 31 मार्च 2021 ला संपलेल्या आर्थिक वर्षात त्यांची उलाढाल 6.57 लाख कोटी होती. यापैकी बहुतांश अधिग्रहित संपत्ती आहेत, ज्यांनी बदल्यात जमीनी स्तरावर खासगी आणि सार्वजनिक गुंतवणूक जमवण्यास मदत केली.

एकुण संपत्तीत 24 टक्केची विक्रमी वाढ

नाबार्डचे अध्यक्ष जी. आर. चिंताला यांनी वार्षिक अहवालात म्हटले आहे की, आम्ही वार्षिक आधारावर एकुण संपत्तीमध्ये 24 टक्केची विक्रमी वाढ साध्य केली आहे. तसेच कर्ज पोर्टफोलियोमध्ये अशाप्रकारची प्रभावी वाढ मिळवली आहे.

त्यांनी म्हटले की, सरकारचे आत्मानिर्भर भारत पॅकेज आणि शेतकर्‍यांच्या मेहनतीमुळे, कृषी क्षेत्राने मागील वर्षी 3.6 टक्केची वाढ नोंदवली आणि चालू आर्थिक वर्षात सुद्धा अशीच कामगिरी होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा

Pune Crime | लाेणी काळभाेर परिसरात दहशत पसरविणारी टोळी तडीपार

Indian Railways | रेल्वेने दिला इशारा! ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान केली ‘ही’ चूक तर होईल 3 वर्षांचा कारावास, भरावा लागेल दंड; जाणून घ्या

Payment Aggregators | डेबिट, क्रेडिट कार्ड नंबरसह एक्स्पायरी आणि CVV सुद्धा आता ठेवावा लागेल लक्षात; RBI करतंय मोठा बदल; जाणून घ्या

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : nabard s loan increased by 25 percent to rs 6 lakh crore in the financial year 2020 21

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update