सलमान-कॅटरिनाची जोडी लवकरच ‘या’ टीव्ही रिअ‍ॅलिटी शो द्वारे प्रेक्षकांच्या भेटीला 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शो द्वारे अभिनेता सलमान खानने सर्वांची मने जिंकली. आता पुन्हा एकदा सलमान खान एका रिअ‍ॅलिटी शो द्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण यात सलमानचा रोल मात्र वेगळा आहे. विशेष म्हणजे यावेळी फक्त सलमानच नाही तर त्याच्यासोबत अभिनेत्री कॅटरिना कैफ देखील या रिअ‍ॅलिटी शो मध्ये सहभागी होणार आहे. हा शो सलमान प्रोड्युस करणार असून कॅटरिना या शो ची जज असणार आहे.

‘नच बलिये’ हा रिअ‍ॅलिटी शो अनेक आवडत्या रिअ‍ॅलिटी शो पैकी एक आहे. या शोचे नवे सिझन लवकरच पहायला मिळणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली आहे. या शो मध्ये आतापर्यन्त टीव्हीच्या सुप्रसिद्ध जोड्या वा विवाहित कपल्स दिसलेत. पण यावेळी शोला नवा तडका देत, ब्रेकअप झालेल्या जोड्या ‘नच बलिए’च्या मंचावर थिरकताना दिसतील. म्हणजेच, शोचे स्पर्धक आपल्या एक्स गर्लफ्रेन्ड वा एक्स बॉयफ्रेन्डसोबत दिसतील. अर्थात अद्याप याबाबतची घोषणा व्हायचीय. पण लवकरच ही घोषणा होईल असे कळतेय. विशेष म्हणजे,या शोसाठी सलमान खान आणि कॅटरिना कैफ हातमिळवणी करणार आहेत. विशेष बाब म्हणजे हा शो सलमान प्रोड्युस करणार असून कॅटरिना या शो ची जज असणार आहे.