home page top 1

अहमदनगर ब्रेकिंग : सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या मनपा स्थायी समितीच्या सभापतीला अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या स्थायी समिती सभापती मुदस्सर शेख यांना आज सायंकाळी अटक करण्यात आली आहे. तो स्वतःहून हजर झाल्याचे सूत्रांकडून समजले.

सर्जेपुरा परिसरात दोन गटात तुफान आरिफ शेख व मुदस्सर शेख यांच्या दोन गटांमध्ये महापालिका निवडणूक वादातून हाणामारी झाली होती. या गुन्ह्यात मुदस्सर शेख यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात शेख फरार होते. आज सायंकाळच्या सुमारास स्वतःहून तोफखाना पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर तोफखाना पोलिसांनी शेख यांच्या अटकेची कारवाई केली आहे.

नगरसेवक मुदस्सर सेक्सी महापालिका निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते त्यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन नगरसेवक आरिफ शेख पराभव केला होता. या पराभवाच्या वादातून आरिफ शेख व मुदस्सर शेख यांच्या गटांमध्ये लोखंडी गज, लाकडी दांडक्यांनी तुफान हाणामारी झाली होती. तसेच जोरदार दगडफेक झाली होती. सर्जेपुरा परिसरात एक महिन्यापूर्वी ही घटना घडली होती. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ईतर बातम्या-
खुशखबर ! १ जुलैपासुन SBI चे ‘होम’ लोन स्वस्त, जाणून घ्या
विधानसभा : ‘नव्या चेहऱ्यां’मुळे शिवसैनिकांना ‘शिवाजीनगर’ मध्ये धास्ती !
ICC World Cup 2019 : ‘या’ कारणामुळे पाकिस्तान संघाचा ‘दारूण’ पराभव झाला : सचिन तेंडूलकर

Loading...
You might also like